Sindhudurg Assembly Elections esakal
कोकण

Assembly Election : ठरलं! 'या' विधानसभा मतदारसंघात मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार!

Sindhudurg Assembly Elections : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सावंतवाडी : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ मनसे स्वबळावर लढविणार आहे, असे येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे नेते तथा चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेली टीका यापुढे खपवून घेणार नाही. अमोल मिटकरींसारखा अजून अन्य कोणी ठाकरेंवर टीका करेल, त्याला मनसैनिक जशास तसे उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बंटी म्हशीलकर, मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, अॅड. राजू कासकर, केतन सावंत आदी मनसैनिक उपस्थित होते. खोपकर म्हणाले, ‘‘राज्यातील राजकीय परिस्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा एकमेव आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे येथील जनता मनसेनेच्या पाठीशी नक्की उभी राहील. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती न बदलल्यास मनसेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करून सरकारला जाग आणू.

Sindhudurg Assembly Elections

मी चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने चित्रपटात कोकणातील युवकांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझ्या दृष्टीने लंडनपेक्षा माझे कोकण सुंदर आहे. केवळ निर्मात्यांना इथे चित्रपटासाठी लागणारी परवानगी मिळेल, त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करायची मिटकरींची योग्यता नाही. आमच्या नेत्यांवर त्यांच्यासारख्यांनी बोलू नये; अन्यथा जशास तसे उत्तर देऊ.’’ यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सनी बावकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, आंबोली विभाग अध्यक्ष काशिराम गावडे, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, इन्सुल्ली शाखाध्यक्ष दिनेश मुळीक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT