सावंतवाडी ः येथील पालिकेच्या ‘हेल्थफार्म’ या प्रकल्पाची पाहणी करताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक. बाजूूला बबन साळगावकर, अन्य नगरसेवक.
सावंतवाडी ः येथील पालिकेच्या ‘हेल्थफार्म’ या प्रकल्पाची पाहणी करताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक. बाजूूला बबन साळगावकर, अन्य नगरसेवक. 
कोकण

उपजिल्हा रुग्णालयाला जनरल हॉस्पिटलचा दर्जा द्या - बबन साळगावकर

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयाला जनरल हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा; जेणेकरून जिल्ह्यातील रुग्णांना या ठिकाणी चांगली सेवा मिळू शकते, अशी मागणी येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली.

पालिकेकडून उभारलेला हेल्थफार्म प्रकल्प तांत्रिक बाबीमुळे बंद आहे. तो मार्गी लावण्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य आयुषच्या माध्यमातून व्हावे, अशी मागणी साळगावकर यांनी केली.

श्री. नाईक हे सावंतवाडी दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी येथील पालिकेला भेट दिली. पालिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत झाले. श्री. साळगावकर यांनी त्यांच्याकडे जिल्ह्यातील प्रश्‍न मांडले. 

श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत तापसरीच्या आजाराने अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यांना वेळेत उपचार आणि तपासण्याचे अहवाल मिळू शकत नाहीत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे यावर योग्य तो मार्ग काढण्यात यावा, तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयाला जनरल हॉस्पिटलचा दर्जा देऊन त्याचे आधुनिकीकरण करा. पालिकेच्या माध्यमातून हेल्थफार्म प्रकल्प उभारला होता. परंतु, तो तांित्रक बाबी आणि आमच्या चुकांमुळे सुरू होऊ शकला नाही. तो कार्यान्वीत करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून योग्य ते प्रयत्न व्हावेत.’’

मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे यांनी येथील पालिकेचा दवाखाना आहे. त्याला आवश्‍यक औषधे आणि आधुनिकीकरणासाठी योग्य ते आर्थिक सहकार्य मिळावे, असे आवाहन केले. या वेळी पुखराज पुरोहित यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी जिल्हा भाजपकडून मागणी केली.

या वेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, दीपाली सावंत, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, पुखराज पुरोहित, संजू शिरोडकर आदी उपस्थित होते.

गोवा-सावंतवाडीचे वेगळे नाते
श्री. नाईक म्हणाले, ‘‘गोवा आणि सावंतवाडीचे वेगळे नाते आहे. त्यामुळे तुमच्या कोणत्याही मागण्यांकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही. उलट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT