कोकण

वेंगुर्ले सीईओ कोकरेंची कर्जतला बदली

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले - स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत वेंगुर्ले शहराचे नाव देशपातळीवर नेणारे येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पालिकेवर त्यांची नियुक्ती केली आहे.

नगरविकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक अधिनियमानुसार मुख्याधिकारी कोकरे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्राच्या ‘स्वच्छ भारत’ उपक्रमात कोकरे यांनी महत्त्वाचे योगदान देताना वेंगुर्ले शहराचे नाव राज्याबरोबरच देशपातळीवर चमकविले होते. कोकरे यांच्या या कामगिरीची दखल घेताना अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता.

मुख्याधिकारी कोकरे यांनी आपल्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले शहर प्लॅस्टिक बंदी करुन प्लॅस्टिकमुक्त केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प योग्य प्रकारे हाताळून येथील डंपिंग ग्राऊंडचा कायापालट केला. झिरो सॉलिड वेस्ट करुन डंपिंग ग्राऊंडला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ असे नाव दिले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत येथील पालिकेला महाराष्ट्रात तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. याबरोबरच हांगणदारी मुक्त शहर, वसुंधरा पुरस्कार, उत्कृष्ट मुख्याधिकारी असे अनेक पुरस्कार त्यांच्या कालावधीत येथील पालिकेला मिळाले आहेत. कोकरे यांच्या बदलीमुळे येथील पालिकेचा अतिरिक्त कार्यभार कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT