कोकण

मल्टीस्पेशालीटीसाठी सावंतवाडीत जागा निश्‍चित - दीपक केसरकर

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलसाठी येथील कुटीर रुग्णालयाची जागा निश्‍चित केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

अर्थसंकल्पात या हॉस्पीटलसाठी आर्थिक तरतूद झाली होती. यानंतर यासाठी चार जागांची पाहणी झाली. प्राथमिक टप्प्यात सावंतवाडीतील जागेला प्राधान्य दिले होते. आता कुटीर रूग्णालयाचीच जागा या प्रकल्पासाठी निश्‍चित केली.

केसरकर म्हणाले, ""कुटीर रुग्णालयासमोर असलेल्या कर्मचाऱ्यांची वसाहत पाडण्यात येणार आहे. तेथे नवी इमारत होईल. धन्वंतरी बंगल्याच्या ठिकाणी असलेल्या जागेत कर्मचारी, अधिकाऱ्यांना क्वाटर्स तयार करण्यात येणार आहे. आताचा तहसीलदार बंगलाही हटविण्यात येणार आहे.'' 

जिल्ह्यातील विजेचा प्रश्‍न आठवड्याभरात सोडविणार आहे. त्यासाठी अधिवेशनादरम्यान उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहीतीही केसरकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ""सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, ओरोस येथील रुग्णालये बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. येणाऱ्या काळात आपण मतदार संघात लक्ष घालणार आहे. चांदा ते बांदा जिल्हा नियोजन आणि अन्य विविध योजनाच्या माध्यमातून आणलेला निधी लोकांपर्यंत पोचण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.'' 

""जिल्ह्यात विजेची समस्या मोठी आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याबाबात उर्जा मंत्र्यांशी चर्चा केली आहे.'' 
- दीपक केसरकर,
पालकमंत्री, सिंधुदुर्ग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT