सावंतवाडी ः येथे पालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण झाले आहे.
सावंतवाडी ः येथे पालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण झाले आहे. 
कोकण

नियोजित अग्निशमन इमारतीचा सुटेना तिढा

अमोल टेंबकर

सावंतवाडी -शहरासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन इमारतीची जागा पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. त्याठिकाणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कार्यालयाला पर्यायी जागा देऊन बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र गेले काही दिवस त्याठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा येवून बस्तान मांडले आहे.

या प्रकाराबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्नात असताना महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून असा प्रकार चुकीचा आहे. याची चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

येथील पालिकेला लागून असलेल्या जागेत अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयाची तरतूद केली आहे. गेली अनेक वर्षे त्याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय होते; मात्र त्यातील अधिकारी अन्य जागेत जाण्यास तयार नसल्यामुळे पालिकेसाठी डोकेदुखी ठरले होते.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे संबंधित विभागाला कार्यालय उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर येथील कार्यालय त्याठिकाणी हलविण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने संबंधित जागा आणि इमारत आपल्या ताब्यात घेतली होती आणि त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात काही आपले विभागसुध्दा हलविले होते; मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा कर्मचारी येऊन त्याठिकाणी बसत आहे.

आम्हाला काम सुरू करायचे आहे, असे असताना त्यांच्याकडून अशा प्रकारे आडमुठे धोरण घेणे योग्य नाही. याबाबत योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित विभागाला कसालमध्ये कार्यालय देण्यात आले. त्यांनी त्याठिकाणी राहून महामार्गाचे काम करणे गरजेचे आहे; मात्र ते काम सोडून येथील कार्यालयात बसणे चुकीचे आहे, अशी नाराजी साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेला आमचे पूर्ण सहकार्य - शेडेकर
याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी प्रकाश शेडेकर म्हणाले, ‘‘आम्ही दोन महिन्यांपूर्वी ते कार्यालय वापरत होतो; मात्र सद्य:स्थितीत त्याठिकाणी कोणीही जात नाही. आज तर तेथील वीज कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. त्यामुळे जाण्याचा प्रश्‍नच नाही. आम्ही पालिकेला सहकार्य करणार आहोत. ज्यावेळी इमारत पाडण्यासाठी घेण्यात येईल, त्यावेळी आमचे अन्य सामान आम्ही परत आणू.’’

महामार्गचे कार्यालय सावंतवाडीतच 
राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कार्यालय पुन्हा सावंतवाडीत येणार आहे. प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाजूला आमची जागा आहे. त्याठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काही तांत्रिक बाबीमुळे हे काम रखडले होते; मात्र लवकरच आम्ही पुन्हा सावंतवाडीत येणार आहोत. कर्मचाऱ्यांचे पगार तसेच सूचना आणि पत्रव्यवहार सावंतवाडीतील कार्यालयातून करण्यात येणार आहे, असे श्री. शेडेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT