कोकण

तीन माजी नगराध्यक्ष एकत्र येतात तेव्हा...

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - स्वच्छता ॲपच्या निमित्ताने का होईना आज येथे आयोजित सभेत तीन माजी नगराध्यक्ष एकत्र आले. यात ॲड दिलीप नार्वेकर यांच्यासह श्‍वेता शिरोडकर आणि अनारोजीन लोबो यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी आपल्याला अनेक वर्षांनी बोलाविले. त्यामुळे बरे वाटले, असे सांगितले तर नार्वेकर यांनी आपल्याला बोलवत राहा आम्ही नक्की येऊ, असे नगराध्यक्ष साळगावकर यांना आवाहन केले.

आजच्या बैठकीवेळी आजी-माजी पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे अनेक वर्षे सभागृहात नसलेले पदाधिकारी नेमके काय बोलतात याकडे अनेकांचे लक्ष होते. यातील माजी नगराध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात प्रवेश करताना माझी जागा त्याठिकाणी होती, मी तेथे बसून प्रश्‍न मांडीत असे, असे साळगावकर यांना सांगितले.

नार्वेकर यांनी सांगितले की, बऱ्याच वर्षापुर्वी सावंतवाडी पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देशस्तरावर आंदोलन केले होते. त्यावेळी शहरात टोपलीचे संडास होते आणि त्या संडासातील मैला उचलून नेण्याचे मी काम केले आहे. विशेष म्हणजे आयुष्यातील एकमेव काम मी चांगले केले असावे, असे त्यांनी सांगितल्यामुळे सभागृहात हशा पिकला. शेवटी त्यांनी या सभेला बोलावणाऱ्या साळगावकर यांचे आभार मानले.

सभागृहात बाहेर पडल्यानंतर आपल्याला आजपर्यत असे कोणी आपुलकीने पुन्हा बोलाविले नव्हते, अशी खंत व्यक्त करुन तुम्ही पुन्हा जरुर बोलवा, आम्ही सहकार्य करू, असे त्यांनी साळगावकर यांना सांगितले.

माजी नगराध्यक्षा सौ. शिरोडकर यांनीही हाच धागा पकडला. आपल्याला सुद्धा गेल्या अनेक वर्षात कधी बोलाविले नाही; परंतु साळगावकर यांनी आपल्याला पुन्हा याठिकाणी बोलाविले. आपले घरातील लग्नकार्य असताना सुध्दा आपण खास बैठकीला उपस्थित राहीले, असे सांगुन त्यांनी आभार व्यक्त केले.

माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आम्ही आमच्या काळात शहरातील स्वच्छतेकडे भर दिला होता. त्यामुळे त्यावेळी सावंतवाडी पालिका तब्बल दोन वेळा राज्यात पहीली आली होती, असे त्यांनी सांगितले. बैठकीत आजी माजी पदाधिकाऱ्यांकडुन सुरू असलेल्या कोटी उपस्थितात; मात्र हास्याचे फवारे उडताना दिसत होते.

तू तू मैं मैं...
विरोधी गटाचे नगरसेवक परिमल नाईक यांनी स्वच्छता मोहीम चांगली बाब आहे; परंतु ही मोहीम राबविताना फक्त परिक्षेपुरता अभ्यास नको तर त्यात सातत्य ठेवा, असे सांगितले. या विषयावरुन श्री. साळगावकर यांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. टिकेसाठी टिका नको, असे त्यांनी सांगितले तर श्री. जाधव यांनी आमची मोहीम अनेक वर्षें सुरू आहे. त्यामुळे तुम्ही माहिती घ्या, असे सांगितले. यावरुन त्यांच्यात ‘तू तू मै मै’ झाली. यात नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी उडी घेण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT