सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग  sakal
कोकण

सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती

सकाळ वृत्तसेवा

ओरोस: राज्याने २४ मेस राज्यातील ७२ गटविकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गाची पदोन्नती दिली. त्यानंतर त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, यात सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. जिल्ह्यातील चार गटविकास अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यातील तीन अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली केली आहे. केवळ एका अधिकाऱ्याला जिल्ह्यातच नियुक्ती देण्यात आली आहे; परंतु पदोन्नतीने बदली करून जिल्ह्याबाहेर पाठविलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यात जिल्ह्याला एकही अधिकारी दिलेला नाही. त्यामुळे कणकवली, देवगड पाठोपाठ सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या पंचायत समित्यांची गटविकास अधिकारी पदे रिक्त झाली आहेत.

सध्या राज्य शासन वर्ग अ, वर्ग ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत आहे. २४ मेस राज्यातील ७२ गटविकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गातील पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. सावंतवाडी गटविकास अधिकारी आर. एस. कणसे, कुडाळ गटविकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, वेंगुर्ले गटविकास अधिकारी श्रीमती यु. बी. पाटील (घारगे) यांचा यात समावेश आहे. यातील व्ही. एम. चव्हाण यांना सध्या कार्यरत असलेल्या कुडाळ गटविकास अधिकारी या पदावर पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे.

आर. एस. कणसे यांना गडचिरोली जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. जे. पी. जाधव यांना रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी, श्रीमती यु. बी. पाटील (घारगे) यांना चिपळूण पंचायत समिती गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, या बदली होऊन परजिल्ह्यात गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर आणखी तीन पदांची भर पडली आहे. परिणामी हा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे द्यावा लागणार आहे.

पाच पंचायत समित्यांचा कारभार प्रभारींच्या हाती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुके आहेत. परिणामी जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. यातील कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग या तीन पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी ही पदे भरलेली आहेत. देवगड व कणकवली गटविकास अधिकारी हा पदभार देवगड सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण हे एकटे हाकत आहेत. त्यातच आता मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांची पदोन्नतीने बदली झाल्याने व त्या जागी दुसरे अधिकारी न दिल्याने या तिन्ही जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे गटविकास अधिकारी रिक्त असलेल्या पाच पंचायत समित्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील वेंगुर्ले वगळता उर्वरित सावंतवाडी, कणकवली, मालवण व देवगड या जास्त ग्रामपंचायती असलेल्या पंचायत समित्या आहेत. त्यामुळे येथे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी असणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT