सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या सुंदराबाई निकम यांचा भाजपात प्रवेश sakal
कोकण

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या सुंदराबाई निकम यांचा भाजपात प्रवेश

काही दिवसांपुर्वीच केला होता शिवसेनेत प्रवेश

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग (वैभववाडी) : मोठा गाजावाजा करून पालकमंत्र्याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुंदराबाई निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. प्रभाग दहामध्ये शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काल (ता.२९) भाजपाच्या माजी उपनगराध्यक्ष संपदा राणे, माजी सरपंच सदानंद माईणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान आज आमदार राणे यांच्या उपस्थितीत प्रभाग दहामधील शिवसेनेच्या प्रभावशाली कार्यकर्त्या निकम यांच्यासह दिवेश गजोबार, रणजित निकम, प्रसाद गजोबार, सुमित निकम, समीर गजोबार, अंकित गजोबार, दीपक धोंडू गजोबार आदी कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार श्री.राणे यांनी सर्वाचे पुष्पगुच्छ देवुन पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी भाजपा पक्ष निरीक्षक गोटया सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, बंड्या मांजरेकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

काल शिवसेनेत काहींनी प्रवेश केला तर आज निकम यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे वैभववाडीत रणधुमाळीचा दुसरा दिवस देखील राजकीय उलथापालथीने गाजला आहे. काही दिवसांपुर्वीच निकम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह पालकमंत्री उदय सांमत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्यामुळे प्रभाग दहामध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

SCROLL FOR NEXT