kokan
kokan sakal
कोकण

Sindhudurga : राणें विरूद्ध शिवसेना संघर्ष शक्य

संतोष कुळकर्णी

देवगड: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात झालेले मोठे फेरबदल, भाजपचे शिवसेनेशी ताणलेले टोकाचे संबंध यामुळे आगामी काळात तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्याचे दूरगामी पडसाद जाणवतील. यापुढच्या काळात सहकारातील निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागणार आहे. बहुतांशी निवडणुकांमध्ये भाजपपेक्षाही राणे विरूद्ध शिवसेना असाच संघर्ष पहावयाला मिळेल.

काँग्रेसनंतर स्वाभिमान पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपोआपच जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने भाजपच्या अधिपत्याखाली आली; परंतु यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले. भाजपमध्ये असलेले अतुल रावराणे, संदेश पारकर शिवसेनावासी झाले. भाजपसोबत युतीमधून निवडणूका लढवलेली शिवसेना ऐनवेळी भाजपच्या हातावर तुरी देऊन राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात थेट मुख्यमंत्री पदाच्या खर्चीवर विराजमान झाली. तेथून भाजप आणि शिवसेनेचा राजकीय संघर्ष सुरू झाला. गेल्या दोन वर्षांत संघर्षाचे अनेक अनुभव जिल्हावासीयांनी घेतले.

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा जन्म झाला; मात्र आता अनेकांच्या नजरा लागून राहिलेली जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळही आता संपत आला आहे. त्यामुळे त्याचीही निवडणूक निश्‍चित मानली जात आहे. तसेच तालुक्याचा मानबिंदू असलेली देवगड अर्बन बँकेची निवडणुकही ऐनवेळी कधीही जाहीर होऊ शकते.

त्याच्या जोडीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूकही येणार आहे. त्यामुळे यापुढचा काळ राजकीय संघर्षाचा राहणार आहे. या सर्व निवडणूकांना शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार काय हाही औत्सुक्याचा विषय ठरेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सहकारातील निवडणूकीत स्थानिक राजकीय वातावरणावर त्याची शक्यता ठरेल.

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूकीच्या दृष्टीने आतापासूनच शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेना पदाधिकारी शहराच्या दृष्टीने विविध विषय हाती घेऊन सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असतात. अलीकडेच दोन नगरसेवक शिवसेनेच्या कंपूत गेले आहेत. आणखीही काही मार्गावर असल्याचा दावा केला जातो. मात्र काहीही असले तरी ऐन निवडणुकीत कसा रंग भरला जाणार यावरच गणिते अवलंबून आहे. मुळ भाजपच्या ताकदीला राणेंचा बुस्टर असल्याने चक्रव्युह भेदण्यासाठी विरोधकांना सक्षम फळी उभारावी लागेल. यासाठी शिवसेनेची नेतेमंडळी रणांगणात उतरतील अशीही शक्यता आहे. परंतु स्वच्छ आणि जनआशीर्वाद असलेले चेहरे निवडणुकीत द्यावे लागणार हे नक्की.

उत्सुकता ताणली

आगामी काळात सहकार आणि नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहणार काय? असा प्रश्‍न आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे अस्त्र असले तरीही जागा वाटपावरून ऐनवेळी त्यांच्यामध्ये काही कुरबुरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत देवगड अर्बन बँकेत राष्ट्रवादी -भाजपची जवळीक आहे. त्यामुळे यापुढे काय होणार याची उत्सुकता ताणली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT