उदय सामंत  sakal
कोकण

सिंधुदुर्गनगरी : उदय सामंत यांच्या हस्ते रुगण्वाहिकांचे लोकार्पण

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन १४ रुग्णवाहिका वितरित

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका मिळाल्या असून या रुग्णवाहिकांचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका वितरित केल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ व पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना रुग्णवाहिका देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली होती. ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी व तळकट, कणकवली तालुक्यातील कनेडी, कुडाळ तालुकयातील कडावल, पणदूर, वालावल, मालवण तालुक्यातील गोळवण, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, सांगेली, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, रेडी या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. याआधीही राज्याच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या.

राज्याकडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकांचे आज पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती अनिशा दळवी यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT