A sudden strike of police on the rotators without cause kokan marathi news 
कोकण

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा अचानक स्ट्राईक....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना विनाकारण शहर आणि परिसरात  फिरणाऱ्या नागरिकांवर  पोलिसांनी  अचानक खाक्या दाखवला.  रस्त्यावर वाहन तपासणी करून सर्वांना आडवले. तुमच्या रक्षणासाठी हे सर्व सुरू आहे तुम्ही बेशिस्त वागणार असाल तर गय केली जाणार नाही. गुन्हे दाखल करू, असा दम देऊन सोडण्यात आले.  

    
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचे काटेकोर  पालन सुरू होते. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्याना पोलिसांच्या फायबर काठीचे फटके खावे लागले तर काहींना दंड भरावा लागला. यामुळे संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू होती. मात्र अत्यावश्यक सेवांसाठी पास दिल्यानंतर रस्त्यांवर वर्दळ वाढली. पासधारक वाढल्याने पोलिसांनीही थोडी उसंत घेतली आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्याचे फावले होते.  परंतु काल सायंकाळी पोलिसांनी अचानक असांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक केला.

रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यावर आणि संचारबंदीच्या कालावधीत मैदानावर वॉक, पाय मोकळे करणे, मुलाला बाहेर फिरवणे, आदींसाठी बाहेर पडलेल्या  चांगलीच अद्दल घडवली. मारुती मंदिर स्टेडियम वर 20 जण होते त्यांना मैदानावर बसवून ठेवण्यात आले. तर प्रत्येक चेकपोस्ट वर वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली.

 मांडवी नाक्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अनेकांना चांगलाच दम भरला आणि आम्ही यापुढे बेशिस्त वागणार नाही हे वधवून  घेतले. यापुढे कायद्याचे उल्लंघन केले तर वाहने जप्त करून गुन्हे दाखल करू, असा ईशारा दिला.       संचारबंसचे उल्लंघन करून  मैदानावर फिरणाऱ्या अद्दल घडविली. अशा २० ते २५ जणांना पोलिसांनी तिथेच बसवून ठेवत चांगलीच शिक्षा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT