Sudhagad
Sudhagad Sakal
कोकण

Pali News : सुधागड वासीयांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

अमित गवळे

पाली - मागील दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला मागील दीड महिन्यापासून सुरुवात झाली आहे. काम सुरू झाल्यावर गुरुवारी (ता. 28) सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

तीस खाटांच्या या ग्रामीण रुग्णालयाचे आतापर्यंत दोन ते तीन वेळा विविध राजकीय पक्ष व पुढाऱ्यांकडून भूमिपूजन झाले होते. मात्र भूमिपूजनाच्या पाट्यांशिवाय कोणतेही काम झाले नव्हते. अनेक राजकीय पुढारी व नेत्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय घेतले.

ग्रामीण रुग्णालय उभे राहावे यासाठी राजकीय पुढारी, नेते, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था-संघटना यांनी आंदोलने केली. हभप पोंगडे महाराज यांनी सुद्धा अनेकवेळा उपोषण केले. मात्र अखेर या सर्वांच्या प्रयत्नांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण रुग्णालय उभे राहत आहे.

यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, श्री बल्लाळेश्वराच्या या नगरीमध्ये अनेक गोष्टी या सहजपणे नवस केला कि पूर्ण होतात मी हि बापाच्या चरणी नवस केला होता कि, लवकर पुन्हा सत्तेत येण्याचा नवस केला होता आणि शिंदे आणि फडणवीस सरकार हे सत्तेत आले आणि नंतर ते नवस फेडायला पण आलो.

माझी पुन्हा सर्वाना विंनती आहे पंतप्रधान मोदी हे थोड्याथोडक्या नाही तर चारशेपार खासदार घेऊन पुन्हा एकदा या देशाचे नेतृत्व करोत असा नवस आपण सर्व पालीकरांनी करावा.

आमदार रविंद्र पाटील म्हणाले कि, या तालुक्यातील विकास कामे राहिलेल्या दिवसात हि शंभर टक्के पूर्ण केली जातील. येत्या बजेट मध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जवळजवळ शंभर कोटीची विकास कामे हि या तालुक्याला मंजूर करून दिली आहेत. ज्या ज्या तालुक्याच्या गरजा आहेत त्या येत्या काळात पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाहीत.

पालीच्या विकासाठी ५ कोटी निधी देण्यात आला असून शहरातील विकास कामांना गती मिळणार आहे. बायपास रस्त्याला बराच वेळ गेला. त्या रस्त्याचा निधी मंजूर आहे मात्र आता बायपासच्या कामाला लवकर सुरवात होईल.

यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य व दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा, भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे,सुधागड पाली तहसीलदार उत्तम कुंभार, भाजपा तालुका माजी अध्यक्ष दादा घोसाळकर, नगराध्यक्षा प्रणाली शेळके, वैशाली मपारा , उपनगराध्यक्ष अरिफ मणियार, मुख्याधिकारी विद्या येरुणकर, नगरसेवक गणेश सावंत, नगरसेवक पराग मेहता, नगरसेविका जुईली ठोंबरे, नगरसेविका प्रतीक्षा पालांडे, पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, गणेश कानडे, अभिजित चांदोरकर, सुशील शिंदे, प्रणाली शेठ,रोहन दगडे,शरद चोरघे तसेच संबंधित शासकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

तिसरे भूमिपूजन

यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले कि, खरं तर ग्रामीण रुग्णालयाचे हे भूमिपूजन किमान तिसरे आहे. आतापर्यंत ज्यांनी उद्घाटन केले त्यांना उदघाटन करण्याची घाई होती फोडलेल्या नारळामधून पाणी येणारच खोबरं या ठिकाणी खायला मिळणारच पण करवंट्या गोरगरिबांच्या पायाला लागू नयेत असा विचार त्यावेळी त्या मंडळींनी केला नाही आणि नारळाच्या ठिकऱ्या उडवण्याचे काम याठिकाणी केले.

मात्र तसं न करता पहिले काम सुरु होईल तेव्हा आम्ही नारळ फोडू अशी भूमिका भाजपच्या वतीने घेतली नारळ फोडल्याने इमारती होत नाहीत त्यासाठी पैश्याची तरतूद, जमीन हस्तांतरण करावी लागते. त्यासाठी निविदा काढावी लागतात या प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि पूर्ण प्रक्रिया केल्यांनतर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होईल त्यावेळी आम्ही नारळ फोडू हि भूमिका तुम्ही भाजपने घेतली. तसेच तालुक्यातील नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

असे असेल ग्रामीण रुग्णालय

साधारण सव्वा एकराच्या जागेत चार इमारती बनणार आहेत. यामध्ये दोन मजली इमारत रुग्णालयाची असेल. दोन इमारती डॉक्टर व कर्मचारी यांच्या निवासासाठी असतील व एक इमारत शवविच्छेदन करण्यासाठी असेल. रुग्णालय इमारतीत आपत्कालीन विभाग जनरल मेडिसिन, बालरोग विभाग, स्त्री आरोग्य विभाग असतील. रुग्णालयाचा कारभार मेडिकल सुप्रिडेंटन यांच्याकडे असेल व त्यांच्या अंतर्गत तीन तज्ञ डॉक्टर असतील.

शिवाय इतर डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माण अधिकारी, टेक्निशियन व कर्मचारी असा स्टाफ असेल. ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन व इतर आवश्यक साधने असतील. आवश्यकतेनुसार सोनोग्राफी मशीन उपलब्ध केली जाईल. रक्त व इतर तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असेल. साधारण पुढील 18 महिन्यांत सर्व काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT