Swapnali Sawant Murder case plan before one month dna test ratnagiri sakal
कोकण

Swapnali Sawant Murder case : दीड वर्षापासून शिजला कट

डीएनए तपासणी होणार; राख, अस्थी समुद्रात दिल्या फेकून

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : वर्ष-दीड वर्षापासून कट रचून अखेर १ सप्टेंबरला दुपारी रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा गळा दाबून त्यांच्या पतीने निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. खुनानंतर मृतदेह घराच्या मागे जाळून सुमारे ७ ते ८ गोणींत राख आणि अस्थी भरून त्या समुद्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला आहे. दरम्यान, सोमवारी (ता. १२) संशयित आरोपीला घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी काही धागेदोरे हाती लागले आहेत; तसेच जी राख सापडली होती ती फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आली असून, डीएनए तपासणी केली जाणार आहे.

या खूनप्रकरणी मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. स्वप्नाली सावंत या गणेशोत्सवासाठी मिऱ्याबंदर येथील आपल्या मूळ घरात आलेल्या होत्या. दोन वर्षांपासून पती सुकांत सावंत आणि त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. हे वाद दिवसेंदिवस ताणत गेले. यातूनच हा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सुकांत व त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या चुलत भावासह कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुकांत सावंत याने १ रोजी दुपारी स्वप्नाली सावंत हिचा गळा दाबून हत्या केली. दिवसभर मृतदेह घरातील मागच्या बाजूला पेंढ्यांमध्ये लपविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चुलत भाऊ छोटा भाई व कामगाराला बोलावले. तिघांनी रात्री घराच्या आवारातच मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील राख, हाडे गोणीत भरून समुद्रात फेकून देण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

मृत स्वप्नाली सावंत यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. हा खुनाचा कट वर्ष ते दीड वर्षापासून रचला जात होता. म्हणून मृतदेह जाळण्यासाठी लागणारे पेट्रोल थोडे-थोडे करून आधीच आणून ठेवल्याचेही समजते. स्वप्नाली सावंत यांच्या रक्ताच्या नात्यातील मुलगा किंवा मुलीचा डीएनए घेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पाच तास घरांची कसून तपासणी

सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, फॉरेन्सिक लॅबची टीम, असा मोठा फौजफाटा मिऱ्याबंदर येथील घटनास्थळी गेला होता. ज्या ठिकाणी मृतदेह जाळण्यात आला, त्या ठिकाणाचीही पोलिसांनी पाहणी केली. काही अवशेष मिळण्याच्या दृष्टीने सुमारे पाच तास शोध सुरू होता. पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT