Talathi and board officer of Gangrai suspended ratnagiri District Administration marathi news ratnagiri
Talathi and board officer of Gangrai suspended ratnagiri District Administration marathi news ratnagiri 
कोकण

पथकाची करडी नजर: गांग्राईचे तलाठी, मंडळ अधिकारी निलंबित

राजेश शेळके

रत्नागिरी:  जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू उपशाला जिल्हा प्रशासनाने लगाम घालण्यास सुरवात केली आहे. तसेच कठोर पाऊले उचलली आहेत. गांग्राई  येथील तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, चिपळूण येथे महसूल विभागाने कारवाई करून अनधिकृत वाळुचा साठा जप्त केला. याचा ठपका ठेऊन गांगराई येथील तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याला निलंबित केले आहे. 

जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर भरारी पथकाची नजर असून बाकायदेशीर वाळूसाठा मिळाल्यास अशीच कारवाई केली जाईल. प्रसार माध्यमांनी अनधिकृत वाळू उपसा अन साठा याबाबत काही ठिकाणे सांगितली आहेत. त्यावर आमची करडी नजर आहे.
जिल्ह्यात हातपाटी वाळू गटांना परवानगी आहे. मात्र काही वाळू माफियांनी महसुल विभागाला न जुमानता अनधिकृ वाळू उपसा सुरू ठेवला आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी वारंवार प्रकाश टाकूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे महसुल आणि खनिकर्म विभागाकडे संशयाची सुई जाते. 


प्रसार माध्यमांना दिसते ते महसुल विभागाला का दिसत नाही, अशा प्रश्‍नांचा जिल्हाधिकार्‍यांवर पत्रकारांनी भडीमार केला. तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपशाविरोधात महसुल विभागाची जोरदात मोहीम सुरू आहे. म्हणून आम्ही गांगराई (ता. चिपळूण) बेकायदेशीर वाळू साठा मिळाल्यावर तो जप्त केला आहे. त्याचा ठपका तेथील तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांव ठेऊन त्यांना तत्काळ निलंबित केले आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी कुठेही वाळू उपसा सुरू असल्यास सांगा तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

 जिल्हाधिकार्‍यांना दिली माहिती 

रत्नागिरी आणि संगमेश्‍वर तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा सुरू असलेल्या काही भागांची माहिती जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली. भरारी पथक मेमून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. गेली काही दिवस सकाळ बेकायदेशीर वाळू उपशावर वारंवार प्रकाश टाकत आहे. त्याची दखल घेऊन गांगराईमध्ये कारवाई केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT