कोकण

Tauktae Impact: मिरकरवाडा येथे भिंत कोसळली तर जयगड बंदरात बोट बुडाली

- राजेश शेळके

रत्नागिरी : तोक्ते (Tauktae Cyclone)वादळाचा धुमाकूळ रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्हाची वेस ओलांडल्या नंतर देखील वादळी वाऱ्याने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा(Mirkwada)परिसराला बसला आहे.

Tauktae Impact wall collapsed at Mirkarwada ratnagiri cyclone update news

तोक्ते चक्रीवादळाने मिरकरवाडा परिसराला दणका दिला आहे. रात्रभर सुटलेल्या वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकाना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नौका एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. रात्रभर हा प्रकार सुरू होता. भीतीपोटी मच्छीमारांनी रात्रभर जागून काढली.

मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू (Kanchan Ocean View)समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मच्छीमारांच्या मदतीसाठी रात्र जागून काढली.

जयगड बंदर येथे बोट बुडाली

रविवारपासून जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून या वादळाचा फटका मच्छिमारांना देखील बसला आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने व खवळलेल्या समुद्राने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे देखील नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छिमाराची नांगरून ठेवलेली बोट काल रात्रीच्या सुमारास बुडाली आहे.

Tauktae Impact wall collapsed at Mirkarwada ratnagiri cyclone update news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT