temperature rise konkan sindhudurg
temperature rise konkan sindhudurg 
कोकण

एकीकडे कोरोनाने कोकणवासीय हैराण अन् आता...

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात दोन दिवसांत कमाल तापमानात मोठी वाढ झाली. काल (ता. 5) रात्री काही भागात तुरळक पाऊसही झाला. आज पूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड उकड्याचा सामना करावा लागला. आज जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

जिल्ह्यामध्ये पुणे हवामान खात्याकडून उद्यानविद्या केंद्राला दिलेल्या माहितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक सरीचा शिडकाव होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. यानुसार जिल्ह्यात 4 ते 8 एप्रिल या कालावधीत तुरळक पावसाची शक्‍यता होती; मात्र पावसाचा शिडकाव झाला नाही. आज पूर्ण दिवस ढगाळ वातावरण मात्र कायम होते. 

जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाळी हंगाममुळे कोकण किनारपट्टीवरील कमाल तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. काल व आज तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. तो मेपर्यंत 45 अंश पर्यंत पोहोचतो की काय? याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी कोकणामध्ये यंदा उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून ही वर्तविली आहे. 

किनारपट्टीवरील भगत प्रचंड उष्ण व दमट हवामान आढळते. त्यात उष्णतेची लाट मे मध्ये आल्यास त्याचा जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. मार्चच्या पूर्वार्धात थंडीचा कालावधी कमी कमी होत गेला व उष्णतेमुळे कमाल तापमानात हळूहळू वाढ होत गेली. यावेळी जास्तीत जास्त कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले होते; मात्र गेल्या दोन दिवसात जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या झळा आणखीनच वाढल्या आहेत. त्यात ढगाळ वातावरणामुळे नागरिकांनाही प्रचंड उकाडा जाणवत आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाड्याने हैराण होण्याची पाळी आली आहे. सद्यस्थितीत जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ असल्याने देश लॉकडाऊन स्थितीत आहे. यामुळे शासकीय तसेच खासगी नोकरदार वर्ग घरीच आहे. 

प्रतिकूल हवामानाचा फटका 
संचार बंदीमुळे कोणालाही बाहेर फिरण्यासाठी बंदी असल्याने सदनिकांमध्ये अशा नागरिकांना उकड्याची मोठी समस्या जाणवत आहे. ग्रामीण भागातही नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पावसाची अपेक्षा नागरिकांना होती. तुरळक सरीही दिलासादायक ठरल्या असत्या; मात्र जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT