kokan sakal
कोकण

संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीत

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्‍घाटन; अरिहंत संकुल येथे कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रामटेक, नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचा उद्‍घाटन समारोह उद्या (ता. २५) येथे होणार आहे. या केंद्राचे उद्‍घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम उद्या दुपारी १२ वाजता एसटी स्टॅंडसमोरील अरिहंत संकुल येथे होणार आहे. कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त व लेख अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, गुरुकुलचे संचालक प्रा. पराग जोशी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे विशेषत्वाने उपस्थित राहतील.

उद्‍घाटन कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, यांच्यासह सर्व आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आभासी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

मंत्री सामंत यांचा पुढाकार

महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठाच्या चढत्या आलेखाला व सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विद्यापीठाच्या चार उपकेंद्रांच्या घोषणेमुळे एकमेव संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. एसटी स्टॅंडसमोरील संकुलात उपकेंद्र उभारले जात आहे. सुरवातीला २० हजार चौरस फुटांहून अधिक परिसरात संगणक लॅब, डिजिटल क्लासरूम यांसह योग कक्ष आदी अनेक सोयींनी सज्ज असे उपकेंद्र आकार घेत आहे. लवकरच उपकेंद्राचे स्वतंत्र भवनही साकार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT