thirteen hunter In the trap of forest department in mahad
thirteen hunter In the trap of forest department in mahad 
कोकण

महाडमधील तेरा शिकारी वन विभागाच्या जाळ्यात

सुनील पाटकर

महाड - मंडणगड तालुक्यातील तिरडे-बौध्दवाडी येथे शिकारी साठी गेलेल्या महाडमधील तेरा जणांना वनविभागाने जाळ्यात अडकवले आहे. या शिका-यांकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, बंदुक, रायफल व मृत अवस्थेतील ससा वनविभागाने ताब्यात घेतला आहे. दापोलीचे वनक्षेत्राधिकारी सुरेश वरक यांनी ही कारवाई केली.

महाडमधील हे तेरा जण शिकारीसाठी आले असल्याची माहीती वनविभागाला हॅलो फॉरेस्ट या पोर्टलवरून मिळाली होती. यानंतर, तातडीने सुरेश वरक यांनी आपले सहकारी अमित निमकर, एम. जी. पाटील, एन. के. जांभळे, डी. आर. भोसले, संतोष परशेट्ये, सिध्देश्वर गायकवाड यांच्यासह मंडणगड येथे धाव घेतली आणि एका पिकअप् गाडी मधून शिकारीसाठी जात असलेल्या या टोळीची झडती घेतली असता, त्यांच्याकडून मृत अवस्थेतील ससा, एक सिंगल बेरल बंदुक, एक जिवंत काडतूस, रायफल, चार्जिंग बॅटरी इत्यादी शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. हे साहित्य तसेच वाहन व तेरा जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. सौरभ लाड, अशोक आंबवले, अमित आंबवले, रविंद्र जाधव, अमित पवार, अविनाश भोसले, अनिल खेडेकर, विनय नगरकर, प्रविण गायकवाड, रणजित खेडेकर, संदेश महाडिक, योगेश सावंत व  नीलेश मोटे यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT