thirty quarantine personnel from Ranpar ratnagiri 
कोकण

रनपार मधील 13 जण क्वारंटाईन...

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनाबाधित रुग्णाने चार दिवस पावस रनपार येथे वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळ्ये पावस रनपार परिसरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. येथील 13 जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाने ट्रक मधून मुंबई ते रत्नागिरी मार्गे बांबवडे असा प्रवास केला. हा ट्रक रत्नागिरीतील एका कम्पनी मध्ये थांबला होता. ट्रक चालक व अन्य प्रवासी यांनी तेथे ३ दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा ट्रक रत्नागिरी मधून कोल्हापूरच्या दिशेने निघाला. 26 एप्रिल रोजी रात्री ९ वाजता साखरपा आणि रात्री ११ वाजता तो बांबवडे येथील पेट्रोल पंपावर पोहोचला. याचवेळी चालकांच्या मालकाने विडिओ कॉलिंग मध्ये अन्य तिघांना पाहिल्यानंतर त्यांना गाडीतून उतरविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तिथल्या पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन सीपीआर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या रुग्णाचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर रनपार या परिसरात या रुग्णसोबत जे संपर्कात आले त्याचा शोध घेण्याचे पोलिसांचे काम सुरु केले होते. हा रुग्ण गाडीतून फारसा बाहेर न पडल्याने फारसा धोका नसला तरीही खबरदारी म्हणून रत्नागिरी पोलिसांनी तेथील १३ जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले आहे अशी माहिती श्री. इंगळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT