home loan esakal
कोकण

दोन वर्षाची प्रतीक्षा संपली; अखेर आज मिळणार हक्काचं घर

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तिवरे धरणफुटीच्या (Tiware Dam)घटनेला उद्या (ता. २) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी तिवरे येथे कंटेनरमध्ये राहणाऱ्या दहा कुटुंबांना प्रथम प्राधान्य देत १० घरांचे लोकार्पण केले जाईल. दोन वर्षे कंटेनरमध्ये राहिल्यानंतर ही दहा कुटुंबे हक्काच्या घरात प्रवेश करणार आहेत.tiware-dam-accident-rightful-family-homes-today-kokan-news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांच्या हस्ते ऑनलाईन कळ दाबून या घराचे लोकार्पण केले जाणार आहे; मात्र गृहप्रवेशाच्यावेळी शिवसेना नेते आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम आदी उपस्थित राहणार आहेत. तिवरे धरणफुटीच्या घटनेत तब्बल ५४ कुटुंबे बाधित झाली. या कुटुबांसाठी अलोरे येथे पुनर्वसनाअंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात २४ घरे उभारली असून त्यातील काही घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. २ वर्षे कंटेनरमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना प्राधान्याने घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सोडत काढण्यात आली.

पहिल्या टप्प्यात १० घरांसाठी सोडत काढण्यात आली तर उर्वरित १४ घरांसाठी येत्या काही दिवसांतच सोडत काढली जाणार आहे. १० घरांचे लोकार्पणावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य, विनोद झगडे आदी उपस्थित राहणार आहेत.

उन्हाळ्यात कंटेनर होते तापत

धरणफुटीच्या घटनेत ज्यांची घरे वाहून गेली त्यांना राहण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. अशा कुटुंबांसाठी शासनाकडून कंटेनरची व्यवस्था करण्यात आली. उन्हाळ्यात कंटेनर तापत असल्यामुळे त्यात राहणे सोयीचे नव्हते. पर्याय नसल्यामुळे धरणग्रस्तांनी दोन वर्ष या कंटेनरमध्ये हलाखीचे दिवस काढले अखेर शुक्रवारी त्यांना हक्काची घरे उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात अटक

Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT