pali
pali 
कोकण

रा.जि.प.डिजिटल शाळा धोडसेमध्ये तंबाखूमुक्त व स्वच्छतेची दहीहंडी

अमित गवळे

पाली, ता. 4 (वार्ताहर) गोकुळाष्टमी निमित्त रा.जि.प.डिजिटल शाळा धोडसे येथे प्रबोधनात्मक दही हंडी साजरी झाली.  तंबाखूमुक्त शाळा व स्वच्छ भारत मिशन  उपक्रमांतर्गत शाळेत तंबाखूमुक्त व स्वच्छतेची दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी सर्वांनी स्वच्छते विषयीं  व तंबाखु मुक्तीची शपथ घेतली.

मुख्याध्यापक दिलीप गावीत व उपशिक्षिका सिमा सिरसट यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने दहीहंडीला विविध प्रबोधनात्मक संदेश बांधले.  जसे आपला परिसर स्वच्छ ठेवा, शौचालय बांधा घरोघरी आरोग्य नांदेल तुमच्या दारी, गाडगेबाबांचे एकच मंत्र स्वच्छतेचे जाणा तंत्र, स्वच्छ परिसर सुंदर परिसर, स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे व तंबाखुचे सेवन रोगांना आमंत्रण, विडी सिगारेट ओढतांना आठवण कर मुलाबाळांना, तंबाखूचे सेवन कर्करोगाला निमंत्रणन, तंबाखू सोडूया आरोग्य सुधारूया आदि. हंडीच्या भोवती लावलेले हे संदेश फलक गावकरी व विद्यार्थी कुतूहलने वाचत होते. 

यावळी दिलीप गावीत व सीमा सिरसट  यांनी तंबाखू पासुन होणारे दुष्परीणामांविषयी व स्वच्छते विषयी माहीती दिली.  शाळेतील शिक्षक, विदयार्थी  व पालक ग्रामस्थ यांनी तंबाखूमुक्तीचा संकल्प केला. सर्वांनी स्वच्छते विषयीं  व तंबाखु मुक्तीची शपथ घेतली. सोमजाई ग्रामस्थ मंडळ व सोमजाई मित्रमंडळ धोंडसे यांना उपक्रम ख़ुप आवडला. यावेळी गावाती महीला मंडळ सुद्धा उपस्थित होते. या उपक्रमाचे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश तायडे, गट शिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी व विस्तार अधिकारी मोरे मॅडम यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT