कोकण

देवस्थान समिती अध्यक्षपदी राणे

CD

72816
वैशाली माडे, सायली कांबळे

वैशाली माडे, कांबळे
७ ला कणकवलीत
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ७ जानेवारीला सायंकाळी साडेसातला प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, सायली कांबळे व त्यांच्या गायणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रसिद्ध हास्य कलाकार दिगंबर नाईक, अभिनेत्री किशोरी अंबिये, सुहास परांजपे, नृत्‍यांगणा हेमलता बाणे आदी कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
---
देवस्थान समिती
अध्यक्षपदी राणे
मालवण ः कांदळगाव येथील देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, विश्वस्त मंडळाची २०२१-२२ ते २०२६-२७ पर्यंतची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी उदय राणे यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष बाबुराव परब, सचिव संतोष परब, उपसचिव विशाल राणे, खजिनदार मधुसुदन परब, उपखजिनदार विश्राम राणे, विश्वस्त बाबाजी परब, विद्याधर राणे, संजय परब, विष्णू राणे, दिनेश परब, संतोष राणे, महादेव परब, शशिकांत राणे, दयानंद परब, श्रेयस राणे, सुनील घाडी, गोपाळ गुरव, सदानंद कदम, संतोष कांदळगावकर, प्रभाकर कांदळगावकर.
----------------
वेताळबांबर्डेत नाईट
अंडरआर्म स्पर्धा
कुडाळ ः वेताळबांबर्डे ब्राह्मणवाडी श्री महापुरुष मित्रमंडळातर्फे १४ ते १६ जानेवारी या कालावधीत नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा सायंकाळी ७ वाजता आयोजित केली आहे. स्पर्धेत एका दिवशी दोन संघ सेमी फायनलला जातील. विजेत्या संघाला १०००१ रुपये, उपविजेत्या संघाला ७००१ रुपये व प्रत्येकी चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे दिली जातील. नाव नोंदणीसाठी १२ जानेवारीपर्यंत हेमंत गोडकर यांच्याशी संपर्क साधावा.
--
कलंबिस्त येथे
आज जत्रोत्सव
सावंतवाडी ः कलंबिस्त येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव ४ जानेवारीला होत आहे. सकाळी पूजाअर्चा, सायंकाळी दर्शन, रात्री पालखी मिरवणूक आणि वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
---
सातार्डा येथे
आज नाटक
सावंतवाडी ः सातार्डा येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे उद्या (ता.४) सायंकाळी ७ वाजता खानोली दशावतार नाट्यमंडळाच्या ’पवित्र दान’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन दामोदर मेस्त्री यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT