कोकण

बांद्यातील ‘बैलघुमटा’वर २२ ला स्वच्छता

CD

बांद्यातील ‘बैलघुमटा’वर २२ ला स्वच्छता
सावंतवाडी, ता. ११ ः बाराव्या शतकात आदिलशाही सुभा असताना बांदा येथे उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक बैलघुमटाची स्वच्छता २२ ला दुर्ग मावळा परिवारातर्फे करण्यात येणार आहे. याबाबत आयोजकांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील गोवा सीमेलगत असलेल्या बांदा गावास प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभला आहे. त्या काळी ‘बांदे’ (बांदा) हे नावाजलेले शहर म्हणून ओळखले जायचे. १२ व्या शतकाच्या आसपास आदिलशाहीत बांद्याला सुभ्याचे महत्त्व होते. युसूफ आदिलशहाने ‘बांदे’ गावाचे नाव बदलून ‘अदिलाबाद’ केले. देवगिरीच्या दरबारात सापडलेल्या मोडी कागदपत्रांमध्ये या गावाचा ‘बांदे’ असाच उल्लेख आहे. संस्थानकाळानंतर या गावाला ‘बांदा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याकाळी आदिलशहाने बांधलेले घुमट, मशिदी आणि विहिरींचे अवशेष आजही बांद्यात पहावयास मिळतात. गोवा सीमेलगत पत्रादेवी मार्गावर आमराईच्या पुढे टेकडीवर असलेल्या ‘बैलघुमटा’ची पडझड झाली आहे. या वास्तूकडे दुर्लक्ष झाल्यामुळे घुमटावर अनेक झाडे आली असून चहुबाजूंनी झुडपांनी वेढला आहे. ठिकठिकाणी प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या पडलेल्या असून ही ऐतिहासिक वास्तू संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी २२ ला सकाळी आठला दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व बांदा ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या वास्तूच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन दुर्ग मावळा परिवारातर्फे गणेश नाईक यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT