कोकण

नेत्र चिकित्सा शिबिरास कोळोशी येथे प्रतिसाद

CD

79517
कोळोशी ः नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

नेत्र चिकित्सा शिबिरास
कोळोशी येथे प्रतिसाद
नांदगाव, ता. ३० ः गजानन विकास मित्रमंडळ कोळोशी-मधलीवाडी यांच्या वतीने कोळोशी गणेश मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्त दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उत्सवाचे हे १५ वे वर्ष होते. मंगळवारी (ता. २४) सकाळी नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन करून या सोहळ्याला सुरुवात होणार झाली. दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकू व फनीगेम्स, सायंकाळी मुलांसाठी रंगभरण चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा, रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर बुधवारी (ता. २५) सकाळी काकड आरती, धार्मिक कार्यक्रम, महाआरती, मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, दुपारी तीर्थप्रसाद व महाप्रसाद वाटप, सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक, महाआरती व भजन, रात्री लकी ड्रॉ सोडत, पैठणी वितरण व बक्षीस समारंभ झाला. त्यानंतर बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब-भटवाडी मालवण यांचा नाट्यप्रयोग झाला. या नाट्यप्रयोगास रसिकांनी भरभरून दाद दिली. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मित्रमंडळाचे पदाधिकारी, मुंबईकर चाकरमानी, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT