कोकण

मंगळसूत्र चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

CD

मंगळसूत्र चोरीप्रकरणी
दोघांवर गुन्हा दाखल
सावंतवाडी ता. १ ः महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी दोघा अज्ञातांवर येथील पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. ही घटना ३० जानेवारीला दुपारच्या सुमारास माठेवाडा परिसरात घडली होती. पोलिस असल्याचा बहाणा करत त्या दोघांनी अनुराधा सापळे या महिलेची फसवणूक केली होती. त्यानंतर सापळे यांनी आज येथील पोलिस ठाण्यात आपली रीतसर तक्रार दिली. त्यात २८ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे आपले मंगळसूत्र चोरीला गेल्याचे म्हटले आहे.
सापळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३० जानेवारीला माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात गेले होते. तेथून माघारी परतत असताना दोघे समोर आले. त्यांनी आपण पोलिस असल्याचे भासविले. मास्क का नाही लावला, असेही विचारले. यावेळी तशी कोणती सक्ती सद्यस्थितीत सावंतवाडीत करण्यात आली नाही, असे मी त्यांना सांगितले; मात्र आपण महिलांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आलो आहोत. सावंतवाडी शहरात चोरटे फिरत आहेत. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला ड्युटीवर पाठविले आहे. तुम्ही तुमचे मंगळसूत्र काढून या कागदात ठेवा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली. ते मंगळसूत्र त्यांनी आपल्या हातातील कागदाच्या पुडीत बंदिस्त केले व माझ्या पिशवीत ठेवले. त्यानंतर तुम्ही आता इथून निघू शकता, असे सांगितले. काही क्षणातच तिथून त्यांनी पळ काढला. काही वेळानंतर मी माझ्या पिशवीतील मंगळसूत्राची पाहणी केली असता पिशवीतील पुडीत अंगारा आणि दगड आढळून आले, असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT