कोकण

एन्रॉन पुलाची होणार लवकरच दुरुस्ती

CD

rat०८७.txt

बातमी क्र. .७ (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-RATCHL८२.JPG ः
८१३२१
चिपळूण ः महापुरात खचलेल्या एन्रॉन पुलाच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
---
एन्रॉन पुलाची होणार लवकरच दुरुस्ती

बांधकाम विभागाकडून वर्कऑर्डर ; अतिवृष्टीत खचल्याने वाहतूक बंद

चिपळूण, ता. ८ ः महापुरात खचलेल्या गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
चिपळूण शहर व परिसरात २१ व २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीत व महापुरात एन्रॉनचा पूल खचला होता. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता; मात्र हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवासीवर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत होती. शिवाय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमापच्याअंतर्गत मार्गावर वाढल्याने सातत्याने वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या एन्रॉन पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू होते. आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांनीही अधिवेशनात हा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला होता.
या पुलाच्या कामासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता करून, तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोनवेळा निविदा प्रक्रिया पार पडली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये देवरे ॲण्ड कंपनीला या कामाचा ठेका मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरदीप रामसे यांनी नुकतीच ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर दिली आहे. त्यामुळे लवकरच या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

SCROLL FOR NEXT