कोकण

दाभोळ ःपूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले

CD

फोटो ओळी
-rat९p२६.jpg ः KOP२३L८१६११आंजर्ले ः वाहतुकीस त्रासदायक ठरणारा नवीन पूल.

पूल बांधून सार्वजनिक बांधकामने काय साधले?
आंजर्लेकरांचा सवाल ; रस्त्यापासून उंच, पुढे वळण
दाभोळ, ता. ९ ः आंजर्ले येथील उभागर तिठा येथील पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेले पूर्वीचे सिमेंटचे पाईप काढून त्या ठिकाणी नवीन छोटा पूल बांधण्यात आला असून, हा पूल रस्त्यापासून उंच असल्याने व पुढे वळण असल्याने या ठिकाणी एसटी बस जाण्यास अडचण होत असून बसचालकांना बस वळवताना ती पुढे मागे करावी लागत आहे. अवजड वाहनांनाही हा पूल त्रासाचा ठरत आहे. हा पूल बांधून सार्वजनिक बांधकाम विभागाने काय साधले, असा प्रश्न आंजर्लेकर नागरिकांकडून विचारला जात आहे
आंजर्ले येथून उभाआगरमार्गे केळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वी मोरीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाले होते. काम पूर्ण झाल्यावर काही दिवसांपासून एसटी बससेवा सुरू झाली असून, या मोरीवरून बस वळवताना चालकाला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मोरीची उंची वाढवण्यात आल्याने या मोरीवरून बस वळवताना बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या आपल्या दुकानाच्या दिशेने कलंडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे पत्र आंजर्ले येथील व्यापारी मदन जैन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.आंजर्ले येथील अनेक ग्रामस्थांनी या पुलाचे बांधकाम सुरू असताना ठेकेदाराला अनेकवेळा सूचना देऊनही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने त्याकडे दुर्लक्ष केले असून या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याची माहिती आंजर्ले येथील ग्रामस्थ व भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT