कोकण

व्यवसायांतून स्वतःला सिद्ध करा

CD

82427
आडाळी : समृद्धी ग्रामसंघ वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा मोंडकर. सोबत सरपंच पराग गावकर, श्रीमती देसाई, श्रीमती गोसावी, विशाखा गावकर आदी.

व्यवसायांतून स्वतःला सिद्ध करा

प्रज्ञा मोंडकर ः आडाळीत समृद्धी बचतगट महासंघ मेळावा उत्साहात

दोडामार्ग, ता. १३ ः महिलांनी जिद्द दाखवत व्यवसायात उतरावे. तुम्ही एकदा स्वत:ला सिद्ध केले की मग तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत जाते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात मार्केटिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून उत्पादनाचे मार्केटिंग सुलभपणे करता येईल. मोंडकर्स फूडसलाही ऑनलाईन मार्केटिंगचा खूप फायदा झाला आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील उद्योजिका प्रज्ञा मोंडकर यांनी केले. कोरोना काळात एक संधी म्हणून पाहत आम्ही लोकांना घरपोच सेवा दिली. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील आडाळी येथील १२ बचतगटांच्या समृद्धी ग्रामसंघाचा वर्धापनदिन शनिवारी (ता. ११) आडाळी येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजिका मोंडकर, उमेद अभियानचे अधिकारी कृष्णा जाधव, अध्यक्षस्थानी सरपंच पराग गावकर, पत्रकार राजेश मोंडकर, समृद्धी ग्रामसंघाच्या स्मिता गावकर, समृद्धी गावकर, उत्कर्षा कदम, गीता शेट्ये, मेघा गावकर, संजीवनी गावकर, शिक्षिका श्रीमती देसाई, श्रीमती गोसावी, उदय कदम आदी उपस्थित होते.
सरपंच गावकर म्हणाले, ‘‘आज बचतगटांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य उपलब्ध आहे. त्याचा महिलांनी लाभ घेऊन आपला उद्योग-व्यवसाय सुरू करावा. आडाळी एमआयडीसी ही आपल्यासाठी माठी संधी आहे. येथे मोठय़ा प्रमाणात उद्योग येणार आहेत. या संधीचा लाभ घेतला पाहिजे. येत्या एक-दोन वर्षांत समृद्धी ग्रामसंघाला अद्ययावत कार्यालय सुरू करून दिले जाईल. एकेकाळी शासन अथवा बँक एवढ्य़ा प्रमाणात निधी देत नव्हते. आज बचतगटांसाठी अनुदानावर कर्ज उपलब्ध होत आहे. तुम्ही केवळ योजनांचा लाभ घेतला पाहिजे. त्यातून प्रामणिकपणे काम करून उद्योग सुरू करा. यासाठी पूर्ण मदत राहील. भविष्यात आडाळी एमआडीसीत अनेक उद्योगधंदे येणार आहेत. आयुष मंत्रालयातर्फे होणाऱ्या आयुष प्रकल्पामुळे अनेक आयुर्वेद कंपन्या येथे येणार आहेत. या संधीचा येथील स्थानिकांनी लाभ घेतला पाहिजे.’’
‘उमेद’चे जाधव म्हणाले, ‘‘महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घतला पाहिजे. महिलांना उपजतच बचतीची सवय असते. त्यामुळे त्यांच्यासाठी बचतगटांतून रोजगाराची संधी उपलब्ध आहे. उमेदकडून विविध स्तरावर टप्प्याटप्प्याने लाभ दिला जातो. उद्योगांतून उपजीविका सुरू केली पाहिजे. आपला जिजाऊ प्रभागसंघ हा जिल्ह्यात पहिला आहे. त्याला २५० गट आहेत आणि १८ ग्रामसंघ जोडलेला मणेरी गट आहे. जिजाऊ प्रभागसंघाची जनजीवन महिला शेतकरी उत्पादन कंपनी नुकतीचत स्थापन केली. अशी जिल्ह्यातील पहिलीच कंपनी आहे. त्याचे सभासद झाल्यास शासनाच्या स्मार्ट प्रोजेक्ट बाळासाहेब कृषी अन्नप्रक्रिया उद्योग आदींचा लाभ घेता येईल. त्या माध्यमातून उत्पादनाला ऑनलाईन मार्केट उपलब्ध होणार आहे.’’
.................
चौकट
ग्रामसंघाच्या कार्यकारिणीची निवड
यावेळी ग्रामसंघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून विशाखा गावकर, सचिवपदी सुलक्षा गावकर आणि उपाध्यक्षपदी संजना गावकर यांची निवड करण्यात आली. वर्धापनदिनानिमित्त बचतगटाची समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. सहभागी तसेच विजेत्या गटांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच महिलांचे विविध खेळही घेण्यात आले. या कार्यक्रमाला बचतगटातील महिला मोठ्य़ा संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक समृद्धी ग्रामसंघाच्या समृद्धी गावकर यांनी, सूत्रसंचालन विशाखा गावकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT