कोकण

किर्लोसमध्ये पाककृती स्पर्धेस प्रतिसाद

CD

किर्लोसमध्ये पाककृती स्पर्धेस प्रतिसाद

२० जणींचा सहभाग; कृषी अधिकारी कार्यालयाचा उपक्रम

मालवण, ता. १४ : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे किर्लोस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी पाककृती स्पर्धा घेण्यात आली. यात वीस महिलांसह कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ विवेक सावंत उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, सरपंच साक्षी चव्हाण, माजी सरपंच प्रदीप सावंत, मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे, कृषी अधिकारी दिनेश लंबे, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, कृषी पर्यवेक्षक एस. जी. परब, कृषी पर्यवेक्षक डी. के. सावंत, अमृता भोगले, सुषमा धामापूरकर, मनीषा गीते, विद्या कुबल, स्नेहा चौखंडे, पवन सांगडे, सुशीलकुमार शिंदे, अश्विन कुरकुटे, सुनील कदम, सर्व कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापिका श्रीमती राणे उपस्थित होत्या. डॉ. विलास सावंत व विवेक सावंत-भोसले यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगताना तृणधान्यांमध्ये असणारे विविध घटकांचे सेवन केल्यामुळे शरीराला फायदा होतो. शरीर सुदृढ राहते. रोग प्रतिकारकशक्ती वाढते, असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती जिकमडे, डी. के. सावंत यांनी केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत अतुल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. दिनेश लंबे यांनी प्रास्ताविक केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित आयोजित पाककला कृतीमध्ये सहभाग घेतलेल्या महिलांना अनुक्रमे प्रथम तीन व उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आभार डी. के. सावंत यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT