swt२०२.jpg
८४०१८
कोळोशीः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना शिव प्रतिष्ठानचे मावळे.
शिवजयंती उत्सव
कोळोशीत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २० ः शिव प्रतिष्ठान, कोळोशी यांच्यावतीने कोळोशी येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा आणि महिला ढोलपथक विशेष लक्षवेधी ठरले.
शिव प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शनिवारी (ता. १८) यशवंत गड वेंगुर्ले ते कोळोशीपर्यंत पायी मशाल आणत या उत्सवाची सुरुवात झाली. काल (ता. १९) सकाळी ढोलताश्यांच्या गजरात ग्रामपंचायत कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत ते कोळोशी गावढणपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महिला ढोल पथक विशेष लक्षवेधी ठरले. विविध मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमानंतर दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू व लहान मुलांचे फनी गेम पार पडले. सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्री लकी ड्रॉ सोडत झाली. यामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ग्रामदेवता दशावतार नाट्यमंडळ, बिडवाडी यांचा ‘पतिव्रतेची पुण्याई’ हा नाट्यप्रयोग झाला. या नाट्यप्रयोगाला रसिकांची मोठी गर्दी झाली होती. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शिव प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.