कोकण

शृंगारतळी मतिमंद शाळेत ''अलाईव्ह''तर्फे साहित्य वाटप

CD

swt2329.jpg
L84841
गुहागरः शृंगारतळी येथील जीवनज्योती मतिमंद प्रशाळेतील मुलांना साहित्याचे वाटप करताना मनोज कल्याणकर, प्रशांत सावंत व इतर.

शृंगारतळी मतिमंद शाळेत
‘अलाईव्ह’तर्फे साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ः गुहागर येथील श्री देव व्याडेश्वर आयोजित बीच महोत्सवात येथील सुप्रसिद्ध अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून शृंगारतळी (ता. गुहागर) येथील जीवनज्योती मतिमंद प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत ग्रुपच्या सदस्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला. यापूर्वी चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेत देखील साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी ग्रुपचे संयोजक मनोज कल्याणकर आणि प्रशांत सावंत यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोहम सातार्डेकर व संजय चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी बोलताना कल्याणकर यांनी ग्रुपच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांत विविध स्टॅच्यू सादर केले जातात. या कलेला रसिकांकडून देखील प्रोत्साहन मिळते. यातून गोळा होणाऱ्या प्रोत्साहन रकमेतून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याच माध्यमातून शृंगारतळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. भविष्यात देखील शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT