कोकण

राजापूर-श्री सदस्यांनी जमवला 11 टन कचरा

CD

पान ५ साठी


८६१७६
श्री सदस्यांनी जमवला ११ टन कचरा
राजापुरात महास्वच्छता अभियान ; ग्रामपंचायतीचेही सहकार्य
राजापूर, ता. १ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने तालुक्यातील श्री सदस्यांनी बुधवारी (ता. १) शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये ९ टन सुका आणि २ टन ओला असा ११ टन कचरा गोळा करण्यात आला. या अभियानामुळे शहरातील रस्ते आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला.
बुधवारी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्याप्रमाणे येथील श्री सदस्यांनी शहरामध्ये स्वछता अभियान राबवले. यामध्ये सहभागी झालेल्या पाचशेहून अधिक श्री सदस्यांनी नगरपालिका हद्दीतील रस्ते आणि परिसराची स्वछता केली. त्याचवेळी शहरातील प्रमुख ठिकाणावरील कचरा उचलत परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमासाठी नगर पालिका प्रशासन, कोदवली ग्रामपंचायत यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

देवरुखातही अभियान
साडवली ः संगमेश्वर, साखरपा, देवरूख परिसरातील स्वयंसेवक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूखमध्ये स्वच्छता अभियान राबवले. संगमेश्वर-देवरूख आणि साखरपा परिसरातून जवळपास १०० स्वयंसेवक या कामासाठी आले होते. बाजारपेठ, स्टेट बँक रोड, मारूती मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मार्लेश्वर पेट्रोलपंप या मार्गावर स्वच्छता केली. देवरूख शहरातील प्रमुख विभागात श्री सदस्यांनी स्वच्छतामोहीम राबवून सेवा या शब्दाची महती पटवून दिली. शहरवासियांनी श्री सदस्यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT