कोकण

सुयश, मिहिर, सोहम, प्रतीकची बाजी

CD

swt218.jpg
86421
जामसंडे : येथील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या स्पर्धर्कांना बक्षिस वितरण करून गौरवण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, पंच उपस्थित होते.

सुयश, मिहिर, सोहम, प्रतीकची बाजी
जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा ः देवगड चतुरंग मंडाळाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. 2 ः येथील चतुरंग बुद्धिबळ मंडळाच्यावतीने जामसंडे येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे प्रथमच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील खुल्या गटात सुयश पेठे (जामसंडे), 17 वर्षाखालील गटात मिहिर सकपाळ (देवगड), 14 वर्षाखालील गटात सोहम देशमुख (सावंतवाडी) तर 10 वर्षाखालील गटात प्रतीक देसाई (सावंतवाडी) पहिले आले.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ बुद्धिबळपट्टू मधुसुदन फाटक व सुधाकर पेठे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेश सकपाळ, खजिनदार श्रीकृष्ण रानडे, सदस्य दयानंद पाटील, महेश कानेटकर, हिराचंद तानवडे, अशोक जाधव, हनुमान क्रीडा मंडळाचे विलास रुमडे, निशिकांत साटम, वाडा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक उत्तरेश्वर लाड आदी उपस्थित होते. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा चार गटात घेण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. दिव्यांग बुद्धिबळपट्टू राजाराम पाताडे (सुकळवाड) यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून रत्नागिरीचे वरद पेठे यांनी काम पाहिले. निवेदन करून आभार अशोक जाधव यांनी मानले. स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा, खुला गट -सुयश पेठे (देवगड), सुश्रुत नानल (कणकवली), श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली), अंकित लब्दे (शिरगाव), अभिषेक सांगळे (देवगड), 17 वर्षाखालील गटात मिहिर सकपाळ (देवगड), अथर्व रानडे ( जामसंडे), आर्यन जोशी (नाडण), 14 वर्षाखालील गटात सोहम देशमुख (सावंतवाडी), शुभम खरात (शिरगाव), निधीश हिरनाईक (जामसंडे), 10 वर्षाखालील गटात प्रतीक देसाई (सावंतवाडी), नाविण्य डोडोस ( कणकवली), शांभवी मोहिते (देवगड)
........................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT