कोकण

निकृष्ट दर्जाचे काम असे ग्रामपंचायतीचे पत्र

CD

निकृष्ट दर्जाचे काम असे ग्रामपंचायतीचे पत्र

त्याच कामाचे खासदार तटकरेंहस्ते उदघाटन
दाभोळ, ता. ५ : दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे २० लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेले शौचालय हे निकृष्ट दर्जाचे असुन त्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे पत्र उन्हवरे ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला दिले असताना त्याच कामाचे पाटी लावून खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करून घेतल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
उन्हवरे गरम पाणी कुंड हे पर्यटनदृष्टया मागासले असल्याने विकासाकरिता निधी प्राप्त व्हावा म्हणून तत्कालीन पंचायत समिती सदस्य सौ.ममता शिंदे व सरपंच अय्याज खोत यांनी सततचा पाठपुरावा करून पर्यटन विकास मधून निधी मंजूर करून घेतला. मात्र महिलांच्या स्नानगृहाला सुस्थितीत दरवाजे नाहीत, कुंडांकडे जाणारी गरमपाण्याची लाईन फुटली आहे. अश्या अनेक समस्या असताना पर्यटनाच्या नावाखाली गरज नसताना सर्वच निधी शौचालयाच्या इमारतीला वापरला गेला असून ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे तेही काम चांगले झाले नाही. ते चांगले व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असतानाच ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार सुनील तटकरे दापोली दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते शौचालयाच्या कामाची पाटी लावून मोजक्या लोकांना सोबत घेऊन उदघाटन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या आमसभेत सदरचा विषय चर्चेला आला होता. त्यावर या निकृष्ठ झालेल्या कामाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला आमदार योगेश कदम यांनी दिले असताना या कामाचे उदघाटन होणे कितपत योग्य आहे, व एवढी घाई का केली गेली असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT