कोकण

हिंदूंना धर्मांतरित करण्याचे षड्‍यंत्र

CD

87151
वायंगणी ः ‘हिंदू राष्ट्र जागृती’ सभेस उपस्थित मनोज खाडये, अॅड. नीलेश सांगोलकर आदी.

हिंदूंना धर्मांतरित करण्याचे षड्‍यंत्र

मनोज खाडये; वायंगणीत हिंदू जनजागृतीची सभा

आचरा, ता. ५ ः भारत देश हिंदू राष्ट्राच्या दिशेने परिक्रमा करत असताना धर्मांतराच्या नावाखाली लाखो हिंदूंना धर्मांतरित करण्याचे षड्‍यंत्र सुरू आहे. जगभरातील नेपाळ, मॉरिशससह १५ देशांना भारताची हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. देशात वाढणाऱ्या अत्याचारांवर लगाम घालायचा असेल, तर केवळ कायद्याचे नव्हे तर न्यायाचे राज्य आणावे लागेल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे वक्ते मनोज खाडये यांनी केले.
वायंगणी (ता. मालवण) येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर हिंदू जनजागृती समितीची ‘हिंदू राष्ट्र जागृती’ सभा काल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वेदपठण सादर केले. सभेच्या निमित्ताने धर्मयोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सभेच्या सांगतेअखेरीस स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
अॅड. नीलेश सांगोलकर म्हणाले, "हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जातेय. लाखो हेक्टर जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. मंदिरांच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी देशासाठी योगदान द्यायला हवे. हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून हिंदूंचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदू धर्मातील धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. हिंदू राष्ट्र साकारण्यासाठी समितीचा वीस वर्षे लढा सुरू आहे. हिंदू राष्ट्राच्या घोषणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. हिंदू धर्म पवित्र आहे; मात्र हेच हिंदुत्व संपविण्यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्मावर चारही बाजूंनी आघात सुरू आहेत. संविधानातून हिंदूंचा घोर अपमान केला जातोय. अमृतमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या हिंदू राष्ट्रात हिंदूंसाठी कायदे नाहीत, ही शोकांतिका आहे."
आमच्या युवकांमध्ये राष्ट्रधर्माची जाणीव निर्माण झाली पाहिले. महिला धर्म शिक्षित व्हायला सनातन संस्थेच्या वक्त्या स्वाती खाडये यांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगून पाश्चात्य संस्कृतीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. देव-देवतांसह महापुरुषांचे होणारे विडंबन थांबवायला हवे. धर्मांतरित लोकांची आकडेवारी पाहिल्यास एक दिवस आपण अल्पसंख्याक होऊ. हिंदू राष्ट्र साकार करायचे असेल संघटित होणे आवश्यक आहे. संघर्ष करूनच हिंदू राष्ट्र मिळणार असून २०२५ सालचा गुढीपाडवा हिंदू राष्ट्रात साजरा होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आनंद मोंडकर यांनी सूत्रसंचालन केले.
................
चौकट
आचऱ्यात १५ ला महाआंदोलन
आचरा तिठा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १५ मार्चला सकाळी १०.३० वाजता हलाल जिहाद, लव्ह जिहाद यावर शासनाकडून कठोर कारवाई करणारे कायदे बनविण्यात यावेत, या मागणीसाठी ''महाआंदोलना''ची साद घालण्यात आली. उपस्थित जनसमुदायाने मोबाईल टॉर्च पेटवून महाआंदोलनाला होकार दर्शविला. हिंदूंवर होणारे अन्याय रोखण्यासाठी आचरा परिसरातील गावांमधील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खाडये यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT