कोकण

कलंबिस्तमध्ये शिमगोत्सवाची धूम

CD

८७४७७

कलंबिस्तमध्ये शिमगोत्सवाची धूम
होळीचे विधीवत पूजन ः भक्तगणांसह ग्रामस्थांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः कोकणातील होळी सण कालपासून (ता. ६) सुरू झाला. जिल्ह्य़ातील गावागावांत, वाड्यावाड्यांत होळी उभाऱण्यात आली. कोकणातील ग्रामीण भागात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सह्याद्री पट्ट्यात आंब्याच्या झाडाची होळी पूजन केली जाते. ही प्रथा आजही जोपासताना कलंबिस्त-गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरेश्वर देवस्थानजवळ विधीवत होळी उभारण्यात आली.
या देवस्थानाकडे गावातील शेकडो भक्तगण आपले नवस फेडण्यासाठी येतात. नवसाला पावणारे म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. गावातील माहेरवाशिणी तसेच आजूबाजूच्या सांगेली, सावरवाड आदी भागातून भाविक येथे येतात. होळी सण पारंपरिक पद्धतीने येथे साजरा केला जातो. यावेळी अनेक भक्त आपल्या समस्या तसेच साकडे देवाकडे मांडतात. भक्तांच्या मनोकामना वर्षभरात पूर्ण होतात, अशी धारणा आहे. त्यामुळे दरवर्षी होळी सणात नवस फेडण्यासाठी अनेक सुहासिनी आणि विशेषतः पुरुष मंडळी येथे हजेरी लावतात. या देवस्थानकडे पाच नारळांचे तोरण, पेढे वाहिले जाते. होळी सणात गावातील पहिली होळी श्री देव धावगिरेश्वर येथे साजरी केली जाते. पर्यावरणपूरक आणि पर्यावरण संतुलन राखण्याच्या अग्रेसर असलेले हे देवस्थान निसर्गरम्य असे ठिकाण आहे. धावगिरेश्वराची राय म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. गणशेळवाडीतील बाल गोपाळ हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुण्यागोविंदाने होळी सण येथे साजरा केला जातो. जय श्री शिवशंकर व जय श्री देव धावगिरेश्वराच्या नामाचा जयघोष होतो. गावाचे पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने व निसर्ग संपत्ती राखण्याच्या दृष्टीने तसेच गावच्या विकासाला हानी पोहोचणारे व पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प हद्दपार करून शेतकरी राजाला बळ दे, असे गाऱ्हाणे यावेळी घालण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT