कोकण

क्राईम पट्टा

CD

rat०७३२.txt

बातमी क्र..३२ ( पान ३)

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दाभोळ ः दापोली तालुक्यामधील शिरसोली बौद्धवाडी येथे रितिक महाडिक या २१ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्चला किरण महाडिक (पोलिस पाटील शिरसोली) यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे रितिक महाडिक हा त्यांचा पुतण्या शिरसोली येथे राहत होता. त्याच्या शेजारी राहणारे काका राजेश महाडिक यांच्या घरात लोखंडी भालाला नऊवारी नायलॉनच्या साडीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. किरण महाडिक यांना व नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात कळवून रितिक याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून तो मृत झाला असल्याचे सांगितले. रितिक याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अधिक तपास दापोली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण करत आहेत.
---

कोकण रेल्वेमार्गावर तरुणाचा मृतदेह

खेड ः कोकण रेल्वेच्या मार्गावरील तालुक्यातील उधळे बुद्रुक येथे रेल्वेच्या रूळावर सोमवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास २८ वर्षीय अजित राजाराम म्हादलेकर या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. या प्रकरणी खेड पोलिस तपास करत आहेत. पोलिस कंट्रोल रूमकडून प्राप्त झालेल्या नोंदीनुसार खबर देणार अनंत सखाराम म्हादलेकर (वय ४५ रा. उधळे बुद्रुक) यांनी येथील पोलिसात खबर दिल्याप्रमाणे त्यांचा मयत भाऊ २८ वर्षीय अजित राजाराम म्हादलेकर यांचा मृतदेह वर नमूद केलेल्या ठिकाणी व वेळी आढळून आला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेमार्गावरून पहाटेच्या वेळी धावणाऱ्या एका एक्स्प्रेसच्या धडकेने २८ वर्षीय अजित राजाराम म्हादलेकर याचा मृत्यू झाला आहे. मयताचा मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात दाखल करण्यात आला. मयताच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेनंतर उधळे बुद्रुक गावात खळबळ उडाली असून, ऐन शिमग्यात म्हादलेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT