कोकण

रक्तपुरवठा सेवाशुल्क वाढीचा फटका

CD

87703
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना देव्या सूर्याजी. बाजूला राघवेंद्र चितारी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, वैभव दळवी, प्रथमेश प्रभू आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


रक्तपुरवठा सेवाशुल्क वाढीचा फटका

देव्या सूर्याजी; रक्ताच्या बॅगची किंमत ४५० वरून ११००

सावंतवाडी, ता. ८ ः राज्याकडून शासकीय रक्तपेढ्यांमार्फत खासगी रुग्णालयांत केल्या जाणाऱ्या रक्तपुरवठा सेवा शुल्कात मोठी वाढ केली आहे. पूर्वी ४५० रुपयांना मिळणाऱ्या रक्ताच्या बॅगसाठी आता ११०० रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्य जनतेला या दरवाढीचा फटका बसणार असल्याने शासनाने ही दरवाढ तत्काळ रद्द करावी; अन्यथा रक्तदान करत रक्ताचे आंदोलन करण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केली आहे.
सूर्याजी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, "राज्यात महिन्याच्या सुरुवातीपासूनच रक्तपुरवठा सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे आहे. मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सरकारी रुग्णालयात असणारा तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव व रिक्त जागांमुळे रुग्णांचे नातेवाईक खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. आता ४५० रुपये किंमतीला मिळणारी रक्ताची बॅग जर ११०० रुपयापर्यंत वाढविल्याने याचा सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. दुसरीकडे रेड सेल, फ्रेश फ्रोझेन, प्लास्मा व इतर रक्तघटकांचे दर देखील वाढविण्यात आले असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचा डाव शासनाने मांडल्याचे दिसून येते. त्यामुळे रक्त पुरवठा सेवा शुल्कात केलेली वाढ मागे घ्यावी; अन्यथा आंदोलन करून लक्ष वेधू.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘नुकतेच आपण उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने लक्ष वेधले. यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ५ सप्टेंबर १९९९ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील रक्तपेढी लोकाग्रहास्तव उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्याकडे स्थलांतरित करण्यात आली; मात्र पदे स्थलांतरित करण्यात आली नाहीत. त्यामुळे ही पदे रिक्त असल्याने रक्तदान शिबिरांसह अतिगंभीर परिस्थितीत रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने शिबिराच्या माध्यमातून रक्तसंकलन करायचे झाल्यास रक्तपेढीतील रिक्त पदांमुळे रक्तदान शिबिरासाठी अनेक संघटना व रक्तदाते इच्छुक असून देखील शिबिर घेणे शक्य होत नाही.’’ यावेळी राघवेंद्र चितारी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, वैभव दळवी, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.
--
रिक्त पदे भरण्याची मागणी
सूर्याजी म्हणाले की, रिक्त पदांत रक्तसंक्रमण अधिकारी वर्ग ३ साठी मंजूर असणारी २ पदे, रक्तपेढी तंत्रज्ञ वर्ग ४ मंजूर ४ पदांपैकी ३ रिक्त, अधिपरिचारिका वर्ग ४ मंजूर असणारी २ पदे, रक्तपेढी परिचारक वर्ग ५ ची मंजूर ४ पैकी ३ व सफाई कामगार वर्ग ५ मंजूर पैकी २ पदे अशी मंजूर ९ पदापैकी तब्बल ८ पदे रिक्त आहेत. तर केवळ तीन जणांच्या जीवावर रक्तपेढी सुरू आहे. त्यामुळे ही रक्तपेढी बंद पडण्याच्या मार्गावर असून रिक्त ८ पदे तातडीने भरण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे संघटनेतर्फे केली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT