कोकण

आमडोसमध्ये महिलादिन उत्साहात

CD

swt913.jpg
L87918
आमडोसः महिलादिनी व्हाळवाडी शाळेत आदर्श ज्येष्ठ महिला सुंदरी चव्हाण यांचा सत्कार करताना वाडीतील महिला.

आमडोसमध्ये महिलादिन उत्साहात
विविध उपक्रमांना प्रतिसाद ः महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः आमडोस व्हाळवाडी शाळा नंबर ३ (ता. मालवण) या शाळेत शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत महिलादिन साजरा करण्यात आला. यावेळी वाडीतील ज्येष्ठ महिला सुंदरी चव्हाण यांचा आदर्श ज्येष्ठ महिला म्हणून पुरस्कार देऊन वाडीतील महिलांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी, शाळा समिती अध्यक्ष दीपक परब, माजी ग्रामपंचायत सदस्या विजया साळगावकर, मुख्याध्यापक मारुती चव्हाण, शिक्षिका रुपाली चव्हाण, वाडीतील सर्व महिला उपस्थित होते. दीपप्रज्वलन सुंदरी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर गाणे सादर केले. वाडीतील महिलांसाठी ''माझी वाटचाल'' हा उपक्रम राबवला. यात सर्वांनी ''माझ्या आयुष्याची झालेली वाटचाल'' यावर आपले मनोगत व्यक्त केले. महिलांसाठी संगीत खुर्ची, मुलींसाठी फुगा उडवणे हे फनी गेम्स झाले. संगीत खुर्चीमध्ये रेवती परब, निकिता परब, छाया दळवी यांनी, तर फुगा उडवणे मोठ्यात गटात पूजा दळवी, वैष्णवी परब, सुवर्णा परब, छोट्या गटात ईश्वरी परब, जानवी भोसले, काव्या चव्हाण, बाल गटात धनश्री साळगावकर, निधी इंदुलकर यांनी यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. महिलांसाठी उखाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ आदर्श महिला म्हणून सुंदरी चव्हाण यांना आकर्षक साडी देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेच्या वतीने विजयी स्पर्धकांना बक्षिसे, उपस्थित महिलांना महिलादिनानिमित्त भेटवस्तू देण्यात आली. शिक्षिका रुपाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT