कोकण

फोटोसंक्षिप्त-बांदा नाबर प्रशालेत महिलादिन उत्साहात

CD

फोटोसंक्षिप्त
87972

बांदा नाबर प्रशालेत
महिलादिन उत्साहात
बांदा ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रशालेच्या विद्यार्थिनी कृपा वारंग, श्रेया हळदणकर यांनी महिला दिनानिमित्त विचार व्यक्त केले. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, जिजामाता, मदर तेरेसा, अॅनी बेझंट, आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर, प्रतिभा पाटील, सानिया मिर्झा यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा केल्या व त्यांच्याविषयी माहिती सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिशा रॉड्रिक्स यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रशाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

केसरी, देवसूत फुलशेतीचे
गव्यारेड्यांकडून नुकसान
ओटवणे ः सावंतवाडी तालुक्यातील केसरीसह देवसू येथे लिलीची फुलशेती गव्यांच्या कळपाने फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेल्या या फुलशेतीला गव्यांच्या कळपाने लक्ष्य केल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. देवसू परिसरात लिलीची फुलशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. केसरी-धनगरवाडीनजीक पुरुषोत्तम परांजपे तसेच देवसू-खालचीवाडी येथील समीर शिंदे यांच्या लिलीच्या फुलशेतीचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले. या भागात इतर शेतकऱ्यांचीही फुलशेती आहे. गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आंबोली वन विभागाच्या वनक्षेत्रपाल कल्पना घोडके, देवसू वनपरिमंडळाचे वनपाल सदानंद परब यांचे लक्ष वेधून नुकसान भरपाईची मागणी केली. उर्वरित फुलशेतीची हानी टाळण्यासाठी गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT