कोकण

हवेली पांगारीत १५ लिटर गावठी दारू जप्त

CD

हवेली पांगारीत १५ लिटर दारू जप्त
दाभोळः हवेली पांगारी येथे एका संशयिताकडून ७७० रुपये किमतीची १५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हवरे पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंदार हळदे यांना हवेली पांगारी येथे गावठी दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ८ मार्चला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास छापा टाकला. त्यांना झुडपाच्या आडोशाला एकजण १५ लिटरची एक प्लास्टिकची बरणी घेवून बसलेला दिसला. त्या बरणीत गावठी दारू आढळून आली. सुभाष गणू सकपाळ (वय ४३, रा. हवेली पांगारी) असे त्या संशयिताचे नाव आहे.
----------
दुचाकींच्या धडकेत पती-पत्नी जखमी
दाभोळः साकुर्डे येथे एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती, पत्नी जखमी झाले आहेत. गव्हे येथील दत्तात्रय सखाराम मोरे हे ८ मार्चला पत्नीला घेवून दुचाकीने (एमएच-०८-एवाय-२२७८) त्यांच्या कांगवई येथे पालखीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना दुपारी दीडच्या सुमारास साकुर्डे येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात मोरे पती-पत्नी दुचाकीवरून खाली पडले. यात मोरे बेशुद्ध झाले. धडक देणारा दुचाकीस्वार दुचाकी टाकून पळून गेला. मोरे पती-पत्नी यांना दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दत्तात्रय मोरे यांनी दापोली पोलिसात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
-------
रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील टिके येथील बोगद्यात जनशताब्दी रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ८ मार्चला सकाळच्या सुमारास घडली. ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कुणाल विजय कांबळे (वय ४१, रा. सांताक्रुज, मुंबई, सध्या रा. मालवण, सिंधुदुर्ग) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत रेल्वे ट्रॅकमन विनोद तुकाराम गावकर यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. विनोद गावकर रेल्वे ट्रॅकची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना टिके येथील बोगदा क्र. ४० मध्ये एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून कुणालच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. गुरुवारी कुणाल कांबळेच्या नातेवाईकांनी रत्नागिरीत येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT