कोकण

गोगटे महाविद्यालयाच्या विज्ञान प्रयोगशाळांत उपक्रम

CD

rat१३१६.txt

rat१३p१६.jpg-
८८७५२
रत्नागिरी ः प्रयोगशाळांमध्ये प्रयोग पाहताना शालेय विद्यार्थी पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात महाविद्यालयाच्या चौकात विविध प्रयोगांची माहिती घेताना शालेय विद्यार्थी.

विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घेतली प्रयोगांची माहिती

गोगटे महाविद्यालय; प्रयोगशाळा सामान्यांसाठी उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा विज्ञानविषयक उपक्रम घेण्यात आला. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र या विभागांनी प्रयोगशाळा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केल्या होत्या. या प्रयोगशाळांत विज्ञानविषयक दैनंदिन जीवनातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मनोरंजक प्रयोगांची मांडणी केली. विभागातील विद्यार्थ्यांनी भेट देणाऱ्या शालेय विद्यार्थी शिक्षक, नागरिकांना हे प्रयोग सादरीकरण करून दाखवले. दिवसभरात सुमारे ७०० शालेय विद्यार्थी, नागरिकांनी या अभिनव उपक्रमात सहभागी होत नवनवीन संशोधन, प्रयोगांची माहिती घेतली.

विद्यमान वर्षी वैश्विक शांतीसाठी आणि वैश्विक सौख्यासाठी विज्ञान या संकल्पनेवर आधारित भारतभरात विज्ञान दिन साजरा झाला. यावर्षी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विविध विभागांनी अनेक उपक्रमांद्वारे विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. ग्रंथालयाशेजारील नवीन इमारतीमध्येसुद्धा गणित विभाग आणि आयटी विभाग यांनी आकर्षक संकल्पनाची मांडणी, सादरीकरण केले. गणित विभागाने गमतीदार कोडी विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित केली होती. जैवतंत्रज्ञान विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग या विभागांनीही आधुनिक उपकरणांच्या प्रदर्शनासह विद्यार्थ्यांना विविधांगी माहिती दिली. अनेक विभागातील या उपक्रमासाठी समाजातील विविध मान्यवरांना उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. दिवसभरात सुमारे ७०० शालेय विद्यार्थी, नागरिकांनी या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन नवनवीन संशोधन, प्रयोगांची माहिती घेतली. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.

छायाचित्र प्रदर्शन...
अभ्यासेतर उपक्रमाद्वारे कार्य करणाऱ्या खगोल अभ्यास केंद्र, मराठी विज्ञान परिषद, नेचर क्लब, विज्ञान मंडळ यांनीही दिवसाचे खगोलशास्त्र, दुर्मिळ वनस्पती, शोभिवंत वनस्पती इत्यादींचे छायाचित्र प्रदर्शन या विषयी भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT