कोकण

रत्नागिरी- श्री सुंकाई मंदिराचा आजपासून कलशारेाहण सोहळा

CD

सड्येतील सुकाई मंदिराचा
आजपासून कलशारेाहण सोहळा
रत्नागिरी, ता. १६ ः तालुक्यातील सड्ये पिरंदवणे, वाडाजून ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री देवी सुंकाई देवस्थानचा कलशारोहण सोहळा शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता. १८) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे. सडये, पिरंदवणे, वाडाजूनमधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री देवी सुंकाई देवस्थानचा ग्रामस्थांच्या, भाविकांच्या आणि दानशुरांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात आला. सुंकाई हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी तांदळा स्वरूपात आहे. शुक्रवारी दुपारी २ वा. कलशारोहण सोहळ्याला सुरवात होणार आहे. सड्येतील अशोक कदम यांच्या निवासस्थानापासून कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सडये, पिरंदवणे, वाडाजूनच्या ग्रामीण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडणार आहे. सायंकाळी ४.३० वा. वे. मू. संदीप भावे यांच्या पौरोहित्याखाली राक्षोघ्न होम विधी करण्यात येणार आहे. १८ मार्चला सकाळी ७ वा. मंदिराची प्रासाद वास्तू व कलश प्रतिष्ठा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वा. कलशारोहण व सत्यनारायणाची पूजा व आरती होईल. दुपारी १२ वा. श्री देवी सुंकाई मंदिर जीर्णोद्धारासाठी योगदान देणार्‍या व्यक्तींचा कृतज्ञता सोहळा होईल. दुपारी १.२० पासून महाप्रसाद सुरू होईल. रात्री १० वा. कोल्हेवाडी येथील श्री सोळजाई नमन मंडळाचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होईल. या सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव सोमेश्वर सुंकाई आणि एण्डोवमेंट ट्रस्ट यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT