कोकण

अभ्यंकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त

CD

८९६७०
रत्नागिरी ः क्रीडास्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षिस देताना मुख्याध्यापक विनोद नारकर व जगदीश चव्हाण. सोबत वैदेही अभ्यंकर, प्रकाश कदम.
-
अभ्यंकर विद्यामंदिरात कवायत, मानवी मनोरे

रत्नागिरी, ता. १७ ः येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमध्ये (कै.) परशुरामपंत अभ्यंकर यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या वेळी तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी कवायत, लेझिमसह मानवी मनोरे सादर केले. शिरगावच्या नेने हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जगदीश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अभ्यंकर स्मृतिदिन शाळेत दरवर्षी शारीरिक शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय स्पर्धा घेतल्या. या स्पर्धांमध्ये बौद्धिक, मैदानी आणि सांघिक स्पर्धांचा समावेश होता. चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लेझिम नृत्य सादर केले. सूर्यनमस्कार, योगासने, मानवी मनोरे यांचे सुंदर सादरीकरण केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रूमाल, डंबेल्स आणि रिंग कवायत सादर केली. तसेच कृतीयुक्त आनंद गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किलबिल या हस्तलिखिताचे प्रकाशन चव्हाण यांनी केले. यात विद्यार्थ्यांनी महिला खेळाडूंची व भारतीय समाजसेवकांची माहिती संकलित केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडित असणारी चित्रेही या अंकात रेखाटली आहेत. शाळेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी केले. हा अहवाल सर्व पालकांना दिला जाणार आहे. यानंतर विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT