कोकण

गावठी बॉम्ब चावल्याने कोळोशीत दोन कुत्रे ठार

CD

गावठी बॉम्ब चावल्याने
कोळोशीत दोन कुत्रे ठार
नांदगाव, ता. १८ ः कोळोशी-वरचीवाडी (ता. कणकवली) येथे गावठी बॉम्ब चावल्याने दोन पाळीव कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोळोशी-वरचीवाडी येथील रहिवासी बाळा सुर्वे, अनिल इंदप यांचे पाळीव कुत्रे नेहमीप्रमाणेच परिसरात फिरत असताना त्यांची नजर अज्ञांताकडून ठेवण्यात आलेल्या गावठी बॉम्बकडे वळली. यातील एका कुत्र्याने आयनल घाटी येथे बॉम्ब चावताच स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा कुत्रा बॉम्ब तोंडातून वस्तीतील रस्त्यावर आणून चावत असताना स्फोट होऊन मृत्यू पावला. याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक खंडागळे, जाधव, पार्सेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलिसपाटील संजय गोरुले, उपसरपंच अतुल गुरव, भाऊ इंदप आदींनी पाहणी करून पंचनामा केला. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने अज्ञातांकडून बागेत असे बॉम्ब ठेवल्यास मनुष्य हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT