कोकण

शेतकऱ्यांना मोबदला देवून जंगल संरक्षित करावे

CD

rat२०३९.txt

बातमी क्र. ३९ (पान ३ साठीमेन)

शेतकऱ्यांना मोबदला देऊन जंगल संरक्षित करा

शाहनवाज शाह ; लाकूडतोडीला आळा घालण्याचा उपाय

चिपळूण, ता. २० ः अत्यंत कवडीमोल दरात शेतकरी लाकूड व्यापाऱ्यांना जंगल तोडीसाठी देत आहेत. शासनाने ती रक्कम शेतकऱ्यांना देवून जंगल वाचवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त शाहनवाज शाह यांनी निवेदनाद्वारे वनमंत्र्यांकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील वनक्षेत्र वाढविणे व त्याचे रक्षण करण्याबाबत नैसर्गिक समतोल राखण्यासाठी विभागाच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने अत्यल्प वनक्षेत्र, खासगी जंगलातून चाललेली अमर्याद वृक्षतोड यामुळे जलसिंचन, भूगर्भातील जलसाठा, वाढणारे कार्बन डाय ऑकसाईड, मोठ्या प्रमाणात होणारा आक्सिजन निर्मितीवर परिणाम, जमिनीची धूप, होणारे भूस्खलन, अनियमित पर्जन्यवृष्टी, ढगफुटी व जैवविविधतेची हानी अश्या अनेक गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे व पुढे ही जावे लागणार आहे. यासाठी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२४८.२ चौ. किमी असून पैकी ९६.०२ चौ. किमी म्हणजेच १.९२ टक्के वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र हे ३३ टक्के असणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय होऊन ज्या दुर्गम डोंगराळ क्षेत्र आहे. तेथे काही ठिकाणी असणारे वृक्षासह जंगल भाग शासनाने आरक्षित करून संबंधित जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन टप्प्याटप्प्याने ताब्यात घ्याव्यात. तसेच आरक्षित वृक्ष लागवड करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे. वस्तुस्थिती पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील अशा जमिनींचा बाजारदर व शासकीय मूल्यांकन फारच कमी असल्याने शासन प्रतिवर्षी आर्थिक तजवीज करून वनक्षेत्रात वाढ करू शकते.
-
अभ्यासगट नेमून लक्ष ठेवणे गरजेचे
खासगी जंगल मालक आपली जंगले हे कोणतेही थेट उत्पन्न मिळत नसल्याने आपल्या अडचणीच्या काळात जंगलतोड व्यापाऱ्यांना अत्यल्प किंमतीमध्ये तोडीसाठी देतात. यासाठी शासनाने त्वरेने अभ्यासगट नेमून प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी जिल्ह्यात जंगल सांभाळण्यासाठी क्षेत्रफळ असणारे झाड, त्याचा प्रकार व वयोमानानुसार त्याला प्रती पाच वर्ष मेहनताना दिला जावा. यासाठी अधिकारी व कर्मचारी नेमणूक करावी अशी मागणी शाह यांनी केली.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT