कोकण

पावस-स्वतःशी स्पर्धा करून प्रत्येक गोष्टीचा ध्यास घ्या

CD

फोटो ओळी
-rat21p25.jg- KOP23L90532
गोळप (ता. रत्नागिरी) ः गोळप कट्टा कार्यक्रमात अनुभव व्यक्त करताना अवलिया श्रीकांत ढालकर.

गोळप कट्टा---लोगो

स्वतःशी स्पर्धा करून प्रत्येक गोष्टीचा ध्यास घ्या
श्रीकांत ढालकर ; मूर्तिकार होण्यासाठी धड्यातून घेतली प्रेरणा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता.२१ ः माझ्या वडिलांना नाटकाची व चित्रकलेची आवड होती अनेक नाटकातून स्त्रियांच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्यामधील गुण माझ्यात आले. लहानपणी शाळेत एक शिल्पकार विनायक करमरकर यांच्यावर धडा होता. मूर्तिकार होण्यास प्रथम या धड्यातून प्रेरणा घेतली. त्यानंतर अनेक निरीक्षणाच्या माध्यमातून मूर्ती घडवू लागलो. त्यामध्ये चांगली गती प्राप्त झाली. स्वतःशी स्पर्धा केली आणि प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेतला तर आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. कुणाला तरी प्रेरणा मिळेल या उद्देशाने या स्तुत्य उपक्रमाला आल्याचे श्रीकांत ढालकर यांनी गोळप कट्टा कार्यक्रमात सांगितले.
गोळप कट्टा या कार्यक्रमात श्रीकांत ढालकर यांची मुलाखत झाली. ते म्हणाले, वडिलांना नाटकाची आणि चित्रकला आवड होती. अनेक नाटकातून स्त्री भूमिकाही वठवली. त्यांच्यामधील गुण माझ्यात आले. प्रसिद्ध मूर्तिकार कृष्णा कांबळे यांच्याकडे तासनतास बसून निरीक्षण करू लागलो. शिकत शिकत मूर्ती घडवू लागलो. 1982 ला पहिली गणपती मूर्तीची ऑर्डर मिळाली. दहावी झाल्यावर जे. जे. स्कूलला जायच होतं. मात्र तेवढी परिस्थिती नसल्याने वडिलांनी बघून चित्र काढायला शिक आणि परीक्षा दे सांगितले. ते अंमलात आणले. चित्रकलेत जम बसला. कॉलेजला असताना आकृत्या, चित्रे काढण्यासाठी प्रचंड संधी मिळाली. पाटबंधारे ऑफिसला अनुरेखकाचे काम मिळाले होते. तिथे चित्रकला आणि गणपती मूर्ती कलेच्या जोरावर कंत्राटी कामगार म्हणून संधी मिळाली. खात्यांच्या स्पर्धात कोकणाला अनेक स्पर्धात कायम पहिला नंबर मिळवून दिला. 2015 ला स्वेच्छा निवृत्ती घेतली.
ढालकर म्हणाले, लहानपणी रामदास पाध्ये यांचा दूरदर्शनवर कार्यक्रम पाहायचो. तो पाहून छंद जडला. आरसा गुरू मानून प्रचंड मेहनत आणि सराव केला. त्यात शब्दभ्रमकलेत यशस्वी झालो. लांजा येथे राजेंद्र कोकाटे या मित्राने पक्षी निरीक्षणाची आवड लावली. निरीक्षण, अभ्यास केला. चित्रे काढली, आवाज हुबेहुब जमायला लागले. कुठे काही पाहिले की आपल्याला आले पाहिजे याचा ध्यास घेतला. नेहमी स्वतःशी स्पर्धा केली आणि प्रगती केली.
-----
चौकट
रंगमंचावरच घडवली विठ्ठलाची मूर्ती

संगीत नाटकात कामे केली. विशेष म्हणजे पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकात 51 प्रयोगात प्रत्यक्ष रंगमंचावर प्रेक्षकांसमोर नाचत दीड ते दोन फूट विठ्ठलाची हाती मूर्ती घडविली आणि रंगविली. आजपर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींच्या हस्ते सत्कार झाला. खूप पुरस्कार मिळाले.

------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT