कोकण

कोकणातील सूर्य उपासना

CD

(१६ मार्च टुडे पान चार)

जनरिती- भाती ............... लोगो

rat२२p१.jpg -
९०६७३
कशेळीचे कनकादित्य मंदिर

rat२२p२.jpg -
९०६७४
डॉ. विकास पाटील

सूर्य मंदिर म्हटले की आपल्याला ओरिसातील कोणार्क येथील सूर्य मंदिर आठवते. याबरोबरच मोढेरा (गुजरात ), श्री मार्तंड मंदिर (श्रीनगर ), ग्वाल्हेरचे सूर्य मंदिर अशी काही भारतातील प्रसिद्ध सूर्यमंदिरे आपल्यासमोर येतात. हा सौर पंथ कोकणातही अस्तित्वात असावा असा अंदाज केल्यास ते ऐकणाऱ्या सहजासहजी पटत नाही. पण कोकणात सौर पंथ अस्तित्वात असावा असा कयास अभ्यासकांनी येथील सूर्य मंदिरांच्या अस्तित्वावरून काढला आहे.

डॉ. विकास शंकर पाटील,पाचल
-

कोकणातील सूर्य उपासना

''कोकणचा सांस्कृतिक इतिहास '' या ग्रंथात भालचंद्र आकलेकर यांनी कोकणात १४ प्राचीन सूर्य मंदिरे असल्याचे म्हटले आहे. कुंतीला सूर्यापासून कर्ण झाला ही कथा महाभारतात आपण ऐकली आहेच. सूर्याचे वडील कश्यप व आई अदिती तर अश्विनीला त्याची पत्नी मानले जाते. अश्विनीपासून त्यास यम, यमी,अश्विनीकुमार व शनी अशी चार मुले असल्याचे मानले जाते. वेदकाळापासून भारतात सुर्योपासना अस्तित्वात असली तरी सूर्य मंदिरांची संख्या मात्र खूपच कमी आहे. सूर्याची मूर्ती देवघरातही आढळत नाही. सातव्या शतकात होऊन गेलेल्या मयूर कवीने सूर्य शतक लिहिले आणि त्याच्या दुःखाचे निवारण झाल्याचा दाखला दिला जातो. कृष्णपुत्र सांब याला कृष्णाने '' तुला कुष्ठरोग होईल '' असा शाप दिला.त्याने सूर्याची स्तुती आणि भक्ती केल्यावर त्याचा कुष्ठरोग बरा झाला असे वर्णन येते. यावरून भारतात सूर्योपासना फार प्राचीन काळापासून असल्याचे दिसते. वेदोत्तर काळात विष्णूचे महत्त्व वाढत गेले आणि सूर्योपासना क्षीण होत गेल्याचे दिसते. असे असले तरी कोकणात अस्तित्वात असणाऱ्या सूर्य मंदिरांवरून कोकणातही सूर्योपासना केली जाते यावरून कोकणचे वेगळेपण आपल्या नजरेत भरते.
कशेळीचा कनकादित्य, कयळघे येथील आदित्यनाथ, नेवरी येथील आदित्यनाथ, माखजन येथील आदित्य नारायण, परुळे येथील आदिनारायण, सातार्डे येथील आदित्यनाथ, आजगाव येथील आदित्यनाथ खारेपाटणच्या प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिरातील सुंदर अशी आदित्यनाथाची मूर्ती अशी कोकणात भाविकांच्या हृदयात घर करून असणारी सूर्य मंदिरे अस्तित्वात आहेत. कोकणात ऐकायला मिळणाऱ्या आदित्य राणूबाईच्या लोककथेतून सूर्यदेव ब्राह्मणाला,मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला आणि म्हातारीला कसे प्रसन्न झाले हे समजते. कोकणातील सूर्य मंदिरातील सूर्यमुर्तींचे कनेक्शन गुजरातशी संबंधित असल्याचे दिसते. कशेळीच्या प्रसिद्ध सूर्य मंदिरातील सूर्यमुर्ती गुजरातहून आल्याची दंतकथा ऐकायला मिळते.१२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची बातमी हल्ल्याच्या अगोदरच तेथील पुजाऱ्याला समजली. त्यावेळी तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यापैकी काही सुंदर मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती पुन्हा परत घेऊन ये अशी सुचना पुजाऱ्याने त्या व्यापाऱ्याला केली होती. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अचानक थांबले आणि प्रयत्न करूनही ते पुढे सरकेना, पुढे जाईना. व्यापाऱ्याने भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना.शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. काही कथेत व्यापाऱ्याला ''मला इथे थांबायचे आहे’, असा मूर्तीने दृष्टांत दिल्याचेही सांगितले जाते. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायण कानिकेला म्हणाले की , "तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध. त्यात माझी स्थापना कर."
कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली,मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणली गेली. तिची प्रतिष्ठापना केली गेली. हे सारे त्या कनकाबाईमुळे घडले. त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.
आजगाव येथील आदित्य नाथाच्या मंदिरातील मूर्ती ही रेड्डी गावच्या एका कोळी बांधवाला समुद्रात मासे पकडताना जाळ्यात सापडली होती. त्याला झालेल्या दृष्टांतानुसार तिची प्रतिष्ठापना झाल्याचे सांगितले जाते. परुळे गावच्या आदि नारायणाचे मंदिर हे सामंत परिवाराचे कुलदैवत समजले जाते. या मंदिराला साडेसातशे वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. ''कोकण आख्यानात'' या देवाचा उल्लेख कनकादित्य आणि आदिनाथ या नावाने आल्याचे दिसते. ही मूर्ती कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या शिल्पाप्रमाणे असल्याचे दिसते सांगितले जाते. रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. संगमेश्वरच्या कर्णेश्वराच्या परिसरात असणारे सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून या सूर्यमुर्तीच्या पायात सात घोड्यांचा रथ आहे तर डोक्यावर बारा राशी असल्याचे दिसते. सकाळची सूर्यकिरणे या मूर्तीच्या पायावर पोहोचतात असे येथील पुजारी सांगतो. कोकणातील आजच्या लोकजीवनात अनुभवायला व ऐकायला मिळणारे हे सूर्योपासणेचे धागे अभ्यासून कोकणातील समृद्ध सौर परंपरा अभ्यासण्याची गरज आहे. भारतीय प्राचीन लोकसंस्कृतीचे सूर्य पूजेचे प्रतिबिंब कोकणच्या लोकसंस्कृतीत आढळते हे कोकणास भूषणावह आणि समृद्ध कोकणाचे दर्शन घडवणारे आहे.
(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT