कोकण

आचऱ्यात रामनवमी उत्सवास प्रारंभ

CD

90731
आचरा ः रामेश्वर मंदिरात श्रींच्या मूर्तींचे विधीवत आगमन झाले.

आचऱ्यात रामनवमी उत्सवास प्रारंभ

५ एप्रिलपर्यंत सोहळा; रामेश्वर मंदिरात गुढीपूजन उत्साहात


आचरा, ता. २२ ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली.
सकाळी मंदिरासमोर गुढी उभारण्यात आली. दुपारी वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरून श्रीरामाची उत्सवमूर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केल्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. नीलेश सरजोशी आणि जोशी पुराणिक यांनी नूतनवर्षाचे संवत्सर फल पंचांगवाचन केले. नंदीचौकावर मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर रघुपती आरतीसह रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली.
गुढीपाडव्यापासून ५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी दहाला दरबारी गायन, दुपारी साडेबाराला रघुपती आरती, सायंकाळी चारला माखन, पाचला सभामंडपातील पुराण वाचन, सायंकाळी सहाला दरबारी गायन, रात्री आठला महापूजा, मंदिरातील पुराण वाचन, रात्री रघुपती आरतीची रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा, रात्री पालखी सोहळा असे कार्यक्रम होणार आहेत. पालखी परिक्रमेस भाविकांची अलोट गर्दी उसळते. कीर्तन कार्यक्रम १ एप्रिल ललितोत्सवापर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षीच्या कीर्तन उत्सवात म्हणून संजय बुवा करताळकर (नागपूर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना संगीत साथ आनंद लिंगायत, तबला साथ अभिषेक भालेकर हे करणार आहेत. २४ ला सुधांशू सोमण (मिठबाव) यांचे गायन, २५ ला सायंकाळी साडेपाचला अथर्व पिसे यांचे गायन, २६ ला सकाळी दहाला दिलीप ठाकूर यांचे गायन (ऑर्गन साथ भालचंद्र केळुस्कर), सायंकाळी साडेपाचला समीक्षा भोवे-काकोडकर (गोवा) यांचे शास्त्रीय गायन, २७ ला सकाळी दहाला विनय वझे व सहकाऱ्यांचे गायन, २८ ला सकाळी दहाला व सायंकाळी साडेपाचला तसेच २९ ला सकाळी दहाला गायक नितीन ढवळीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेपाचला पं. राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांचे गायन होणार आहे. ३० ला मिलिंद बुवा कुलकर्णी यांचे राम जन्माचे कीर्तन, सायंकाळी साडेपाचला निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन, ३१ ला सकाळी दहाला निराली कार्तिक यांचे गायन, १ एप्रिलला रात्री साडेनऊला विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाचा ‘आचरा आनंदरंग’ कार्यक्रम होईल. यामध्ये कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, बाबू कदम, उदय पुजारे यांचा सहभाग आहे. ५ एप्रिलला रात्री हनुमान जयंतीनिमित्त रामेश्वर प्रोडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक ‘गाव तसं चांगलं’ होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर देवस्थान समितीतर्फे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी, सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT