कोकण

प्रा. रमाकांत गावडेंना शैक्षणिक सेवा पुरस्कार

CD

swt२३३२.jpg
९१००१
प्रा. रमाकांत गावडे

प्रा. रमाकांत गावडेंना
शैक्षणिक सेवा पुरस्कार
बांदा, ता. २३ः गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हरमल-गोवा येथे केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते रविवारी (ता. २६) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रा. गावडे हे गेली २७ वर्षे महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे, यासाठी प्राथमिक शाळेतील तब्बल १०० विद्यार्थिनी त्यांनी दत्तक घेत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत इंटींग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने त्यांची पुरस्कारसाठी निवड केली. या सोहळ्यात दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक पुरस्कार प्राप्त व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीयमंत्री रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे खासदार अमरसिंग पाटील, अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, बिदरचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश मेघन्नावर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
..............

swt२३३३.jpg
91002
बांदाः येथील घोडेमोडणी कार्यक्रम. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

बांदा शिमगोत्सवाची
घोडमोडणीने सांगता
बांदाः होऴी पौर्णिमेपासून पंधरा दिवसांनी साजरा होणाऱ्या बांद्याच्या शिमगोत्सवाची पारंपरिक घोडमोडणी कार्यक्रमाने सांगता झाली. सोमवारी बांद्याची रंगपंचंमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानंतर मंगळवारी घोडेमोडणीचा कार्यक्रम झाला. पारंपरिक मार्गाने घोड्यांच्या पाच फेऱ्या झाल्या. ग्रामस्थांनी मार्गात दुतर्फा राहून घोड्यांना प्रसाद अर्पण केला. त्यानंतर बाजारपेठेतील घोडेमोडणी देवस्थान येथे या कार्यक्रमाची सांगता झाली.
...................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT